फलटण /सत्य सह्याद्री वृत्तसेवा
विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूल फरांदवाडी फलटण येथे वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय फुटबॉलपटू सिद्धार्थ कुराडे उपस्थित होते.
राष्ट्रीय फुटबॉलपटू सिद्धार्थ कुराडे यांनी यावेळी मनोगत करताना म्हटले की आजच्या या संगणक जगात मुले खेळापासून वंचित राहत आहेत परंतु विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांचा शैक्षणिक व संगणक शिक्षण बरोबर मैदानी खेळावरती भर आहे याचे मला कौतुक वाटते.
फलटण तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नावारूपाला आलेल्या व शिक्षण क्षेत्रात उतुंग भरारी घेत असलेल्या विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूल फरांदवाडी या स्कुलने कमी कालावधीत मोठा विश्वास संपादित केला आहे. संपुर्ण वर्षभरामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेत अतुलनीय व नेत्रदीपक अशी कामगिरी करणारे अनेक विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी सचिन माने, विश्वज्योत हायस्कूल खारघर (मुबंई)चे दिपक पाटणकर व विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूल लोणंदचे प्रेन्सीपल निलेश तोडणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूलचे पदाधिकारी सचिन माने यांनी मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले की हा कार्यक्रम म्हणजे विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूल मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्या सर्वागीण विकासाकडे ही लक्ष देते यांचे उत्तम उदाहरण आहे.
या कार्यक्रमाचा समारोप करते वेळी विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूल फरांदवाडी प्रिन्सिपल रमोना डिसूजा यांनी यावेळी उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे व सर्व पालकांचे आभार मानले. मुलांना क्रीडा शिक्षक रणजीत देशमुख व सुहास सुहास कदम यांनी मार्गदर्शन केले. या महोत्सवात शालेय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




0 Comments