Hot Posts

6/recent/ticker-posts

प्लास्टिक मुक्तीसाठी सरसावले सरडे ग्रामस्थ



फलटण / सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
सरडे गावचा कारभार व प्रशासन युवकांच्या हाती येत आहे हि बाब गावासाठी अभिमानास्पद असून युवकांनी शारीरिक प्रशासकीय स्वच्छतेबरोबरच  गावातील स्वच्छतेला हातभार लावावा असे प्रतिपादन विधी व न्याय विभागाचे माजी सचिव विरसिंह दादा पाटील यांनी केले. सरडे ग्रामपंचायतींच्या वतीने सरडे गावच्या पोलिस पाटील पदी मनोज दादा मोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्लास्टीक बंदी व कचरा व्यवस्थापन जनजागृती मोहिमेच्या शुभारंभा प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी सरपंच रामदास शेंडगे होते. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण बेलदार, क्रांतिसिंह नाना पाटिल हायस्कूलचे मुख्याध्यापक भरत गरगडे, दत्ता भोसले, कांतीलाल धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
      गावच्या पोलिस पाटील हा गाव व पोलिस यामध्ये दूवा साधणारा घटक आहे सरडे गावाल कै.कृष्णाजी बेलदार यांच्या पोलिस पाटील पदाचा वारसा आहे मनोज मोरे हे पोलिस पाटील पदाची जबाबदारी समक्षपणे पार पाडतील असा विश्वास व्यक्त करून प्लास्टीक बंदी बाबत विद्यार्थी व ग्रामस्थांनी जनजागृती करून आपला गाव स्वच्छ राखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे विरसिंह दादा पाटील यांनी सांगितले.

     

संपूर्ण भारत देश स्वच्छ राखण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे आपला गाव आपली शाळा प्लास्टीक मुक्त व कचराव्यवस्थापन  योग्य पद्धतीने करून घराघरात स्वच्छतेचे महत्व पटवून दिले पाहिजे. मनोज मोरे हा क्रांतिसिंह नाना पाटिल हायस्कूल चा विद्यार्थी असल्याने त्याची पोलिस पाटील पदी झाली आहे हि बाब आनंददायी असून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेकडे लक्ष दिले पाहिजे असे मत भरत गरगडे यांनी व्यक्त केले. प्रारंभी येथील मारूती मंदिरासमोर नूतन पोलिस पाटील मनोज मोरे यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले उपस्थितांचे स्वागत व सुत्रसंचालन दत्ता भोसले यांनी केले तर आभार सरपंच रामदास शेंडगे यांनी मानले.
    कार्यक्रमास दिलीप मोरे, कांतीलाल धायगुडे, विठ्ठल बेलदार, तुकाराम भोईटे, प्रताप मोरे, पोपट भोसले, सोमनाथ गायकवाड, भिमराव चव्हाण, विक्रांत बेलदार, ग्रामविस्तार अधिकारी डी.बी कोकरे, लखन बनसोडे, सुरेश मोरे, रणजित भोसले, दत्तात्रय मोरे, दादा मोरे, यशवंतराव देवकाते सर, आबा खांडेकर, अशोक शेंडगे,  विजय भोसले, पप्पू चव्हाण, यांच्या सह विविध संस्थाचे पदाधिकारी सर्व शिक्षक व विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments