Hot Posts

6/recent/ticker-posts

कराड पालिकेच्या सभेत ४२ विषयांना मंजूरी


कराड/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
कराड नगरपालिका आयोजित सर्वसाधारण सभेत दोन तास ४३ पैकी ४२ विषयांना मंजूरी मिळाली.

काही ठिकाणी गटर स्लॅब नवीन टाकणे.गटर दुरुस्ती करणे.नवीन पाईप लाईन टाकणे. छ.शिवाजी स्टेडियमचा संपूर्ण क्रीडा संकुल परिसर स्वच्छता, सफाई, देखभाल ठेका पद्धतीने मंजूर करण्यात मंजुरी देण्यात आली. कुस्ती आखाड्यात मॅटची सोय करणे.बॅडमिंटन हॉल विकसित करणे. छ.शिवाजी स्टेडियम येथे महिला प्रसाधन गृहांची सोय करणे.छ. शिवाजी स्टेडियम जुने दगडी बांधकाम उतरवून आर.सी. सी. कंपाऊंड बांधणे.  न.पा. शाळा क्र.३ -८ मध्ये स्टेज कट्टा, प्रसाधनगृह दुरुस्त करणे.शाहीन उर्दू हायस्कूलला हॉल बांधणे. घरकुल इमारतीस विद्युत पुरवठा करणे. जलशुद्धीकरण केंद्रावरील पंप सेट्स,ट्रान्सफार्मर दुरुस्त करणे,वायरिंग करणे.
 वाढीव हद्दीतील झोपडपट्टीतील नागरिकांसाठी गृप नळ कनेक्शनची सोय करणे.अण्णाभाऊ नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत कामांची निवड निश्चिती.


 सुपर मार्केट पार्किंग डांबरीकरण करण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात हास्य-विनोद झाले.पार्किंग चा कर एकजण भरतात  तर पार्किंग चा लाभ दुसरेच घेतात.अतिक्रमण चा भार असून कराचा भार मात्र संबंधित गाळे धारकांना सहन कराव्या लागतो.त्यामुळे आधी अतिक्रमण मोहीम राबवून नंतर डांबरीकरण व्हावे,असे नगरसेवक सौरभ पतील ,वैभव हिंगमीरे व महिला ,बालकल्याण समिती सभापती स्मिता हुलवान यांनी सूचना केल्या.

उपनगराध्यक्ष-नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांच्यात किरकोळ शाब्दिक चकमक

सुमंगलनगर ,मुजावर कॉलनी व वाढीव भागातील काही भाग  रस्ते , गटर अशा सर्वच योजनांपासून वंचित असल्याचे नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांनी वारंवार सभागृहात सांगण्याचा प्रयत्न केला. यावरून उपनगराध्यक्ष  जयवंत पाटील व नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांच्यात किरकोळ शाब्दिक चकमक झाली.

दूरदर्शन केंद्र भाडेतत्त्वावर देण्यास पुनरमंजुरी देणे.दत्तचौक ते मार्केट यार्ड मलकापूर कडे जाणारा रस्ता ३०मी.ऐवजी १८ मी.रस्ता मंजुरी तर दत्तचौक ते स्व.दादासाहेब उंडाळकर चौक मार्ग १५ मी. मंजूर करण्यात आला.
कोल्हापूर नाका ते भेदा चौक ,दत्तचौक ते कृष्णानाका ,प्रीतिसंगम उद्यान बाहेरील परिसरात डेकोरेटिव्ह पोल
बसवण्यासंदर्भात  नगरसेवक विनायक पावसकर यांनी सुरक्षेचा मुद्दा मांडला.या विषयी चर्चा करून मंजुरी देण्याचे ठरवण्यात आले.

Post a Comment

0 Comments