Hot Posts

6/recent/ticker-posts

पाटण मधील पत्रकारांचे सामाजिक काम नेहमीच कौतुकास्पद-नारकर


पाटण/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
पाटण हा अत्यंत दुर्गम भाग आहे पाटण मधील पत्रकार हे दुर्गम भागातील पत्रकार असून ही त्यांचे सामाजिक काम हे नेहमीच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचा  पाटणतालुका पत्रकार संघाला पुरस्कार जाहिर झाला म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुक्याच्या वतीने सर्व पत्रकारांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. 
नारकर म्हणाले,  मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्यातील आदर्श जिल्हा पत्रकार संघ व आदर्श  तालुका पत्रकार संघ पुरस्कार देण्यात आले. या वर्षीचा स्व.वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार पाटण तालुका पत्रकार संघाला जाहीर झाला सर्व प्रथम त्यांचे अभिनंदन करून ज्यांनी हा पुरस्कार पाटण पत्रकार संघाला दिला त्या वरिष्ठ परिक्षकांचे ही आभार मानले. निपक्ष पाती पणे बातमीदारी सामाजिक कार्यात नेहेमी सक्रिय सहभाग आणि मुख्यतः डोंगर दर्या वाड्यावस्त्यांवरती असूनही अनेक समस्या नां सामोरे जात या पत्रकारांनी आपली लेखणी बळकत ठेवली आहे. पाटण मधील पत्रकारांनी सर्व सामान्य लोकांचे अनेक प्रश्न बातमीचा माध्यमातून शासन दरबारी पोहचवून त्यांना न्याय मिळवुन दिलेला आहे. पत्रकारांना अत्यंत अल्प स्वरूपात मानधन असते तर काही दैनिकांचा पत्रकारांना मानधन ही नसते परंतु सामाजिक कार्य समजून पत्रकार हा समाजा साठी नेहमी धडपड असतो. पाटण पत्रकार संघाचा या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा राज्य स्तरीय पुरस्कार हा फक्त पत्रकार संघाचा नसुन संपूर्ण तालुक्याचा आहे. या पुरस्कारामुळे पाटण चे नाव आज राज्य भर झाले आहे. 


यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाटण तालुका उपाध्यक्ष राहुल संकपाळ, मरळी विभाग अध्यक्ष हणमंत पवार, वाडीकोतावडे ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष दादासाो सुर्वे, जेष्ठ मार्गदर्शन दिनकर पवार,  स्वप्निल पवार हे उपस्थित होते. तसेच पाटण पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर मोहिते सचिव भगवंत लोहार आणि पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments