वरकुटे-म्हसवड/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून विविध कर्ज योजना राबविण्यात येत असून शेतकरी, व्यापारी, नोकरवर्ग,यांनी कर्ज योजनांचा लाभ घेऊन प्रगती करावी असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज व्यवस्थापक एस. टी. चव्हाण यांनी केले.
ते म्हसवड ता.माण येथे बँकेच्या वतीने कर्ज वाढ अभियान, कार्यक्रमात बोलत होते.यावेळी कर्ज वितरणाचे आण्णासाहेब फरांदे , विभागीय विकास अधिकारी जी.ए. काटे,व शेतकरी, तरुण उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विविध उद्योग व व्यावसायिक कामासाठी कर्ज पुरवठा केला जातो.त्यामध्ये प्राधान्याने शेतकरी वर्ग यांना
कर्ज पुरवठा करणे हे बँकेचे धोरण आहे. त्याच बरोबर सध्या अनेक तरुण वर्ग नवनवीन विविध उद्योग करीत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करण्याचे धोरण बँकेने अवलंबले आहे. कर्ज योजना मध्ये कॅश क्रेडिट,गृसंकल्प पूर्ती योजना, जेसिबी, पोकलेन, वीटभट्टी, पगार तारण,कुकुट पालन, सामान्य कर्ज, शैक्षणिक कर्ज,यासह विविध प्रकारचे व्यवसाय यासाठी बँक कर्ज पुरवठा करते.त्याच बरोबर अनेक बँका व संस्था कमी व्याज दराचे आमिष दाखवून ग्राहकांना लुटतात परंतु जिल्हा मध्यवर्ती बँक कर्जाला कोणतीही फी अथवा भेटीचे पैसे लावत नाही. सरळ व्याज आकारणीमुळे सर्वात स्वस्त कर्ज जिल्हा बँककेकडून मिळते.असे त्यांनी सांगितले.
कर्ज वाढ अभियान कार्यक्रमास म्हसवड भागातील शेतकरी,महिला,तरुण,उद्योजक व बँकेचे सेवक मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास अधिकारी अशोक गोरड यांनी केले,तर देवापुरचे शाखा प्रमुख सदाशिव बनगर यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे नेटके आयोजन केल्याबद्दल म्हसवड शाखेच्या शाखाप्रमुख सौ.सविता कारंडे यांना धन्यवाद दिले.

0 Comments