फलटण/सत्य सह्याद्री वृत्तसेवा
दिनांक ३० रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे तर्फे मुधोजी कॉलेज हॉल येथे "डायरेक्ट जनरल युथ पार्लमेंट चँम्पीयन शिप २०१७" या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे अध्यक्षतेखाली करणेत आले होते. या स्पर्धेत ९ शाळा सहभागी झाल्या होत्या. या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून जेष्ठ पत्रकार रमेश अढाव व मुधोजी कॉलेजचे प्राध्यापक श्री कुंभार यांनी काम पाहिले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. रसाळ सर प्राचार्य मुधोजी महाविद्यालय फलटण हे उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जितोबा विद्यालय जिंती यांना मिळाला तर द्वितीय क्रमांक संजय गांधी विद्यालय गुणवरे यांना तसेच तृतीय क्रमांक छत्रपती शिवाजी विद्यालय गिरवी व उत्तेजनार्थ बक्षीस जयभवानी हायस्कूल तिरकवाडी यांना मिळाला. या वेळी मान्यवर यांचे हस्ते यशस्वी स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके व ट्राँफी देऊन गैरवण्यात आले. या कार्यक्रमास पोलिस कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.





0 Comments