Hot Posts

6/recent/ticker-posts

वरकुटे-म्हसवड ग्रामस्थांनी दिली प्लास्टिकला तिलांजली


वरकुटे-म्हसवड / दिपक काटकर
 ग्रामपंचायत वरकुटे-म्हसवड यांच्यावतीने प्लास्टिक मुक्त गाव करण्याचा निरधार करण्यात आला. शुक्रवारी सकाळी ग्रामस्थ व श्री शंभु महादेव हायस्कुलच्या विद्यार्थींनी गावातील मराठी शाळा,मारूती मंदीर परिसर,स्टँड परिसर या ठिकाणचा प्लास्टिकचा कचरा एका ठिकाणी जमा करून त्या कच-याची विल्हेवाट लावली.गावातील ग्रामस्थांनी प्लाटिक पिशव्याचा व प्लास्टिक  पाण्याच्या बाटल्याचा  वापरू करू नये म्हणुन श्री शंभु महादेव हायस्कुलच्या मुला मुलींनी जन जागृती केली. याबद्दल मुला मुलींचे माजी सभापती श्रीराम पाटील, पंचायत समिती सदस्या लतिका विरकर व ग्रामस्थांनी विषेश अभिनंदन केले.



यावेळी माजी सभापती श्रीराम पाटील,पंचायत समिती सदस्या लतिका विरकर,बबन(दादा) विरकर,सरपंच छाया लोखंडे,ग्रामसेवक वंजारी आण्णा,पञकार अजित काटकर, अनिल पाटील, ग्रा.प.सदस्य सुभाष माने,सुखदेव जाधव,हणमंत माने,जगन्नाथ लोखंडे,जनार्दन बनसोडे,प्रकाश मगर,प्रकाश बनसोडे,इकबाल मुलाणी,रशीद मुलाणी,बापुराव सुर्यवंशी,श्री शंभु महादेव हायस्कुलचे शिक्षक दोलताडे सर, खिलारे सर,शरद जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेऊन प्लास्टिक  पिशव्या वापरण्यावरती बंदी करण्याबाबत चर्चा केली व  यापुढे गावमध्येप्लास्टिकच्या  पाण्याच्या बाटल्याचा व प्लाटिक पिशव्याचा वापर कोणीही करायचा नाही असा ठाम निर्धार केला 

Post a Comment

0 Comments