Hot Posts

6/recent/ticker-posts

पाटण मध्ये आज शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे व्यायामशाळा पाटण यांचा उपक्रम


पाटण/सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने राजे व्यायामशाळा पाटण यांच्या विद्यमाने पाटण तालुक्याचे भाग्यविधाते, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त पाटण येथे आज "दादाश्री" २०१७ टाॅप १५ शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पाटण येथील नगरपंचायत मैदानावर आज सायंकाळी ५ वाजता  हि स्पर्धा होणार आहे.

पाटण नगरपंचायतीच्या विविध योजनांचा आज शुभारंभ

पाटण तालुक्याचे भाग्यविधाते,माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या निमित्त पाटण नगरपंचायतीच्या वतीने विविध योजनांचा शुभारंभ आज शनिवार दि.30 रोजी सायंकाळी ७ वाजता नगरपंचायत मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा सुषमा महाजन, उपनगराध्यक्ष दिपक शिंदे, मुख्याधिकारी अक्षय करमळकर यांनी दिली.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त  व येणाऱ्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर नगरपंचायत पाटण यांचेवतीने शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांच्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना "विक्रमसिंह पाटणकर विशेष क्रीडा गौरव पुरस्कार" योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विक्रमसिंह पाटणकर दिव्यांग शिष्यवृत्ती योजना, तसेच पेन्शन योजना आदी योजनांचा शुभारंभ विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, तरी या कार्यक्रमास   सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments