Hot Posts

6/recent/ticker-posts

गुजरातमध्ये भाजप सरकार पडले तर आनंदच - खा.राजू शेट्टी


फलटण/सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
गुजरात मध्ये भाजपा सरकार पडले तर मलाच काय संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनाच खूप मोठा आनंद होईल असा टोला खा.राजू शेट्टी यांनी लगावला आहे. फलटण येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी बोलताना सांगितले की भाजपचा व एन.डी.ए. शी काडीमोड घेतला असून या पुढे त्यांना पाठिंबा देऊच शकणार नाही. संपूर्ण भारतातून तब्बल १८४ शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते एकत्र येऊन केंद्र सरकारला धडा शिकवणार आहे.

      या वेळी दिल्ली मधील २० व २१ नोव्हेंबरमध्ये झालेल्या दिल्ली येथील किसान परिषदेत जे राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विरोधात आंदोलन केले त्या ठिकाणी सर्वच स्तरातून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणे व सुरू असलेल्या अनागोंदी वागण्यामुळे हे सरकार या पुढे येईल का नाही असा प्रश्न खा.राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. आंदोलनातून शेतकरी संबंधी कोणच ठोस निर्णय घेत नसल्याने अनेक  राज्यातील १८४ शेतकरी वर्गासाठी काम करणाऱ्या संघटना एकत्र येऊन केंद्र सरकारने चालवलेल्या अन्याया विरोधात एकजूट करून आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५० % जादा नफा हे धोरण ठरवणे साठी दोन वेगवेगळ्या समित्या नेमल्या असून एका समितीचा अध्यक्ष मीच स्वतः असलेने या पुढे केंद्रात शेतकरी विरोधी कटकारस्थान होऊन देणार नाही. शेतकऱ्यांना कर्ज माफी ही कायद्यानेच मिळाली पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना या केंद्र सरकारने मदत केली पाहिजे असे त्यांनी सांगितले असून त्याला आता शेतकरी आपला हक्क घेण्यासाठी पुढे येत असून आता शेतकरी विरोधात भूमिका घेणाऱ्या राजकीय पक्षांना खूप मोठा फटका बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत फक्त मते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत असे म्हणणाऱ्या राजकीय पक्षांना लेखी स्वरूपात लिहून  द्यावे लागणार असून आता जो शेतकऱ्यांना फक्त पुतना मावशीचे प्रेम करणारे उघडे पडणार आहेत असे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले. एफ आर पी प्रमाणे दर देणं बंधनकारक आहेच या बरोबर राज्य सरकार व कारखानदार तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत ठरले प्रमाणे एफ आर पी व १०० रुपये लगेच व १००  रुपये नंतर असे जे दर देणार नाहीत त्यांच्या विरोधात आज ही आंदोलन सुरूच असून या प्रमाणे दर न देणाऱ्या कारखानदार व कारखान्यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.     

गुजरात निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले, गुजरात मध्ये मोदी सरकार पडले तर आपल्याला आनंदच होईल  कारण भाजपने तेथील जनतेला फसवले आहे,देशातील शेतकऱ्यांना फसवले आहे,तरुणांना फसवले आहे व्यापाऱ्यांना फसवले आहे फक्त चर्चेत राहण्यासाठी हे ढोंगी मोदी सरकार असून केंद्र सरकारला आता शेतकरीच पराभव करतील असे स्पष्ट मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी सांगितले.

     आजपर्यंत फक्त मते व राजकारण या वेळीच  राजकीय पक्षांनी  मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत असे म्हणणाऱ्या राजकीय पक्षांना धडकी भरेल असे काम स्वाभिमानी  शेतकरी संघटना करणार असून सांगली व कोल्हापूर सारख्या शेतकाऱ्यांसारखी एकजूट तुमच्या सातारा जिल्ह्याने केल्यास तुम्हाला सुद्धा ऊसाचा दर मिळायला काहीच अडचण येणार नाही परंतु तुम्ही विखुरलेल्या अवस्थेत न राहता आपल्या न्याय हक्कासाठी फक्त मताचे राजकारण करणाऱ्या या लबाड राजकारण्यांना धडा शिकवा असे त्यांनी सांगितले या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या बरोबर असेल असे त्यांनी स्पष्ट सांगितले. या पुढे युवकांनी सुद्धा या लबाड राजकारणापासून अलिप्त राहून जे तुम्हाला मते मागायला येणाऱ्यांना तुम्ही आमच्यासाठी काय करणार हे विचारा व ते लिहून द्यावे लागणार असल्याचे सांगा असे प्रतिपादन खा.राजू शेट्टी यांनी केले आहे.

         न्यायालयीन कामासाठी खा.राजू शेट्टी न्यायालयात आले होते या वेळी ते झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी राजेंद्र ढवाण पाटील,सातारा युवा आघाडी जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुका अध्यक्ष नितीन यादव, व सचिन खानविलकर उपस्थित होते.
12/16/17, 20:19 - Rs Vikram Choramale: This message was deleted
12/16/17, 20:19 - Rs Vikram Choramale: IMG-20171216-WA0022.jpg (file attached)
12/16/17, 20:21 - Rs Vikram Choramale: IMG-20171216-WA0023.jpg (file attached)

Post a Comment

0 Comments