औंध। सत्य सह्याद्री वृत्तसेवा
औंध विकास सेवा सोसायटीचे सचिव सचिन लक्ष्मण सूर्यवंशी यांच्यावर त्यांच्या मूळगावी म्हणजेच लांडेवाडी येथे मंगळवारी सायंकाळी दोघांनी प्राणघातक हल्ला केला. संशयितांना अटक करण्यात आली असून दोघांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. शाकिब बाबा शेख (रा. सातारा) व विशाल संदीप भोसले (रा. औंध) अशी दोघांची नावे आहेत. हल्ल्याचे कारण समजू शकले नाही. परंतु, या घटनेने औंध परिसरात खळबळ उडाली आहे.
मंगळवारी सेवा सोसायटीचे काम आटपून लांडेवाडी ता खटाव येथील घरी जात असताना लांडेवाडी रस्त्यावर म्हसोबा मंदीराजवळ शाळेतील विद्यार्थी गाडीवर घेण्यासाठी ते थांबले होते यावेळी दुचाकीवरून आरोपींनी लोखंडी पाईप व कोयत्याने डोक्यात पाय व हातावर वार करून प्राणघातक हल्ला केला. या हल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आरोपींना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली.

0 Comments