Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटण तालुक्यातील गावकामगार पोलीस पाटील पदासाठी 23 उमेदवार पात्र

फलटण/विक्रम चोरमले 
फलटण तालुक्यातील गावकामगार पोलीस पाटील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेद्वारे 23 उमेदवार पात्र ठरले असून कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याचे फलटण प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले. 
फलटण तालुक्यात फलटण शहरासह 126 महसूली गावे आहेत. त्यापैकी कोपर्डे येथे लोकवस्ती नसल्याने तसेच फलटण शहर वगळुन 124 गावात गावकामगार पोलीस पाटील नियुक्त करणे अपेक्षित आहे त्यापैकी 76 गावात सध्या गाव कामगार पोलीस पाटील कार्यरत असून नव्याने 23 गावांसाठी नियुक्त्या केल्यानंतर उर्वरित 25 गावांसाठी पुन्हा जाहीरनामा काढून गावकामगार पोलीस पाटील नियुक्ती प्रक्रिया राबवावी लागणार आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेदरम्यान 38 गावांसाठी गावकामगार पोलीस पाटील नियुक्तीकरीता जाहीरनामा काढण्यात आला होता. त्याद्वारे 145 उमेद्वारी अर्ज दाखल झाले छाननी दरम्यान 3 अर्ज अपात्र ठरल्याने 142 उमेदवारांसाठी लेखी परिक्षा घेण्यात आली. त्यावेळी 1 उमेदवार गैरहजर राहिला उर्वरित 141 पैकी 107 पात्र ठरले तर 34 अपात्र ठरविण्यात आल्याचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले. 

38 गावांसाठी जाहीरनामा काढण्यात आला मात्र त्यापैकी 25 गावातून गावकामगार पोलीस पाटीलपदासाठी वरीलप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल झाले तर खालील 13 गावांसाठी त्यापुढे नमूद करण्यात आलेल्या आरक्षणाप्रमाणे उमेवारी अर्ज दाखल झाले नसल्याने तर दोन गावातून प्रत्येकी 1 अर्ज दाखल झाला आणि तेही अपात्र ठरल्याने त्या दोन जागाही रिक्त राहिल्या आहेत. 


उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने गावकामगार पोलीस पाटील नियुक्तीसाठी रिक्त राहिलेली 13 गावे पुढीलप्रमाणे


होळ (अ.ज.), खुंटे (अ.ज.महिला), ढवळेवाडी (आसू) (अ.ज.महिला), कुरवली खुर्द (अ.ज.महिला), ठाकुरकी (अ.ज.), सासकल (अ.ज.), अलगुडेवाडी (अ.ज.), भाडळी बुद्रुक (अ.ज.), वडगाव (भ.ज.ब महिला), कोळकी (भ.ज.ड), कोर्‍हाळे (भ.ज.ड), चांभारवाडी (भ.ज.ड), फडतरवाडी (वि.मा.प्र.).
पवारवाडी (आसू) आणि खटकेवस्ती येथे प्रत्येकी एकेक उमेदवारी अर्ज दाखल झाला मात्र दोन्ही अपात्र ठरल्याने तेथील गावकामगार पोलीस पाटीलपदाची जागा रिक्त राहिली आहे. 

खालीलप्रमाणे 23 गावांसाठी गावकामगार पोलीस पाटील उमेदवार नियुक्तीस पात्र ठरले आहेत


विश्‍वास पोपट काकडे (साठे), सुवर्णा गुलाब लवंगारे (वेळोशी), विकास तात्याबा शिंदे (गोखळी), हनुमंत महादेव अहिवळे (विंचुर्णी), लता शामराव रणदिवे (मुंजवडी), मनोज दादा मोरे (सरडे), संतोष विठ्ठल खिलारे (शिंदेनगर), शितल नवनाथ जाधव (ताथवडा), दिपक चंद्रकांत भिंगारे (आदर्की बुद्रुक), प्रणाली योगेश बोडके (विठ्ठलवाडी), गौरी विक्रम बनकर (ढवळ), अश्‍विनी बबन टेंबरे (बरड), भरत दत्तात्रय अडसूळ (तरडगाव), अश्‍विनी पोपट ढमाळ (नाईकबोमवाडी), पल्लवी शरद पवार (धुमाळवाडी), मनिषा रमेश बोबडे (रावडी बुद्रुक), दयानंद नारायण चव्हाण (शेरेचीवाडी ढवळ), स्वाती प्रमोद डफळ (उपळवे), माधुरी दत्तात्रय सावंत (पिराचीवाडी), माधुरी पांडुरंग पवार (भवानीनगर राजुरी), रसिका हेमंत भोसले (चौधरवाडी), अमोल विठ्ठल शिंदे (वाघोशी), प्रितम चंद्रकांत शिंदे (शिंदेवाडी).

गावकामगार पोलीस पाटील पदासाठी वरीलप्रमाणे 23 गावातील उमेदवार सर्वाधिक गुणांकन मिळाल्याने नियुक्तीस पात्र ठरले आहेत. मात्र त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, पूर्तता व अन्य माहिती घेतल्यानंतरच त्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे फलटण प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments