Hot Posts

6/recent/ticker-posts

एसटीच्या विरोधातील पत्रकारांचे उपोषण मागे, सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य


फलटण/सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
 एसटी महामंडळ फलटण डेपोच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात फलटण तालुक्यातील तालुका व शहर सर्व पत्रकार यांच्या वतीने आज दिनांक १६/१२/२०१७ रोजी सकाळी ठिक ८:३० वाजता एसटी महामंडळ फलटण (एसटी स्टँड) येथे उपोषण करण्यात आलेले होते. या आंदोलनाची दखल घेत एसटी प्रशासनाने लेखी स्वरूपात सर्व मागण्या मान्य केल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.

फलटण एसटी स्थानकाच्या विविध समस्येबाबत आज सकाळी ८:३० पुकारण्यात आलेल्या उपोषणाला सर्व फलटण तालुका व शहर मधील पत्रकारांनी एसटी स्थानकाबाहेर सुरवात केली. काही वेळात फलटण तालुक्यातील जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, विविध पक्ष व संघटना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी उपोषणस्थळी येऊन जाहीर पाठींबा दिला तसेच फलटण एसटी स्थानकाच्या विविध समस्या यावेळी मांडल्या. काही वेळाने उपोषणस्थळी फार मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. या आंदोलनाची दखल विभागीय नियंत्रक सातारा जिल्हा या एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन यावेळी उपस्थित जेष्ठ पत्रकार मा. अरविंद मेहता व जेष्ठ पत्रकार मा. रवींद्र बेडकेहाळ तसेच जेष्ठ पत्रकार मा. रमेश आढाव यांनी एसटी स्थानका विषयी तक्रारी मांडल्या. एकूण सर्व मागण्या रास्त असून उद्धटपणे बोलणाऱ्या अधिकऱ्याला तत्काळ निलंबित केले असल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली तर आगार प्रमुख यांची १५ दिवसात बदली करण्याचे लेखी आश्वासन व मागणी केलेल्या तक्रारींवर कारवाई करण्यात येईल व एसटी सेवेत बदल केला जाईल असे सातारा विभाग नियंत्रक ताम्हणकर यांनी दिले असून इतर ही सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून एक महिन्याच्या आत सर्व सेवा देण्याचे मान्य केले आहे.



वेळेत एसटी बस वेळेवर न सुटणे, प्रवासी जेष्ठ नागरिक विद्यार्धी यांच्याशी उद्धटपणे बोलणे, धोकादायक एसटी बसेस मधून प्रवासी वाहतूक करणे, एसटी बसेसची साफसफाई न करणे,ऐनवेळी बसेस रद्द करने, एसटी पास देणेसाठी दिरंगाई करणे या व ईतर सर्व एसटी समस्येबाबत अनेक वेळा फलटण तालुक्यातील जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, विविध पक्ष व संघटना यांनी यापूर्वी वारंवार निवेदन व आंदोलन करूनही एसटी डेपोतर्फे कोणतीच योग्य कारवाई होत नव्हती यामुळे आज शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार उपोषणास बसले होते यावेळी अनेक गोष्टीचा पाठपुरावा होत नसलेने व सर्वांनाच उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती यामुळे या विरोधात आवाज उठवण्यात आला यासाठी शहरासह तालुक्यातील सर्वांनीच या उपोषणास पाठिंबा दिला होता या मध्ये राजकीय,सामाजिक,शैक्षणिक ,तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी याच बरोबर इतर सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.


 सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून फलटण तालुक्यातील शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार उपोषणास सुरवात केली होती यात सर्वांनी हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दिला होता. लेखी आश्वासन घेतल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती सर्व पत्रकार यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments