फलटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
तहसीलदार फलटण यांच्या आदेशानुसार भरारी पथकाने फलटण तालुक्यातील सर्व 4 साखर कारखान्यांना अचानक भेट देवून या कारखान्यांच्या ऊस वजन काट्यांची तपासणी शेतकरी संघटना प्रतिनिधी समवेत केली असता सर्व कारखान्यातील वजनकाटे बिनचूक असल्याचे आढळून आले असल्याचे सांगण्यात आले.
कापशी ता. फलटण येथील शरयू अॅग्रो इंडस्ट्रीज, उपळवे ता. फलटण येथील स्वराज इंडियाचा लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर साखर कारखाना, साखरवाडी ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्स आणि फलटण येथील श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखाना या चारही कारखान्यांना भेट देवून या कारखान्यांचे काटे तपासण्यात आले असता ते बिनचुक आढळल्याचे सांगण्यात आले.
या भरारी पथकात वैधमापन शास्त्र विभाग फलटणचे निरिक्षक अ.ग. नाईकवाड, महसूल खात्यांतर्गत पुरवठा अव्वल कारकुन एस.एच. जगताप, पुरवठा निरिक्षक एम.जे.काकडे यांचा या भरारी पथकात समावेश होता या भरारी पथका समवेत शेतकरी संघटनेचे नितीन यादव, रविद्र घाडगे, संतोष कदम यांनी वरील चारही साखर कारखान्यात जावून तेथील वजनकाटे तपासण्यासाठी गव्हाणीजवळ वजन होवून गेलेली वाहने परत बोलावून इलेक्ट्रॉनिक स्केलवर प्रमाणित वजनाद्वारे व डेड वेटच्या सहाय्याने नियमाप्रमाणे सदर काट्यांची तपासणी करण्यात आली त्यावेळी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले असून सर्व चारही कारखान्यातील वजनकाटे योग्य वजन दाखवित असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment