फलटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण आगाराच्या अनेक समस्येच्या बाबत नुकतेच जेष्ट पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रा. रमेश आढाव यांच्यासह शहर व तालुक्यातील अन्य पत्रकार यांनी विविध समस्येच्या मागणीसाठी साताऱ्यासह मंत्रालयापर्यत पाठपुरावा केला होता या मध्ये एसटी आगार विषयक अनेक समस्या सुटलेल्या असून आज मकरसंक्रांतिच्या दिनी रविवार दिनांक 14 रोजी रिंगरोड वरील पूर्वेकडील गेटचे काम पूर्ण करून काही प्रमाणात होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. जेष्ट पत्रकार व केंद्रीय रेल्वे बोर्ड सल्लागार तसेच एसटी प्रवाशी संघटनेचे मार्गदर्शक प्रा. रमेश आढाव यांनी याबाबत अनेक दिवसापासून केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
रिंगरोड येथील बाजूने ये जा करण्यासाठी पूवेकडे गेट करण्याची मागणी प्रा. रमेश आढाव यांनी केली होती. एसटी आगारातील ईमारत व इतर कामासाठी राज्य शासनाकडून साडे सहा कोट रुपयांची मंजुरी आली असून त्यानुसार सध्या काम चालू असून त्यानुसार काम दर्जेदार होत आहे का हे आज प्रत्यक्ष पहाणी करून पाहिले व अधिकारी यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.
तसेच आगारातील काही भागातील डांबरीकरणाचे काम पाहिले यावेळी हे डांबरीकरण (बीबीएम) हे व्यवस्थित झाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले तसेच होणाऱ्या कामातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या यावेळी आगार व्यवस्थापक रामदास व्यवहारे, वाहतूक व्यवस्थापक, हरीष काकडे, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, प्रवासी, एसटी कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment