फलटण शहराला अतिक्रमणाचा विळखा, अतिक्रमणावर प्रशासन व नगरसेवकाची चुप्पी (सत्य सह्याद्री विशेष वृत्त) - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, January 14, 2018

फलटण शहराला अतिक्रमणाचा विळखा, अतिक्रमणावर प्रशासन व नगरसेवकाची चुप्पी (सत्य सह्याद्री विशेष वृत्त)


फलटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
फलटण शहरात गेली अनेक महिने ठिकठिकाणी तसेच क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते रिंगरोडवरील अपघाताची संख्या वाढत असून अनेकाना यामध्ये  आपला जीव गमवावा लागला आहे या परिसरात बेकायदेशीर अतिक्रमणे वाढल्याने नगर पालिका आजून किती जणांचा बळी गेल्यावर अतिक्रमणावर कारवाई करणार आणि जनतेच्या प्रश्नावर नगरसेवक आक्रमक होणार का असा सवाल नागरिकांच्यामधून विचारला जात आहे.

फलटण शहरात भर रहदारीच्या जागेवर अतिक्रमणे वाढली आहेत राज्यात तसेच सातारा जिल्ह्यात सर्वत्र अतिक्रमणाविरोधात कारवाई होत असताना याला फलटण शहर अपवाद ठरत आहे. फलटण शहरातील रस्ते रुंद होण्याऐवजी अतिक्रमणामुळे अरुंद होत चालले आहे यामुळे वारंवार वाहतूक कौंडिला आणि अपघाताला सामोरे जावे लागत आहे. मध्यतरी एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या तोंडी तक्रारीवरून फलटण बस स्थानकासमोरील  हातगाडी वाल्यावर नगर पालिकेने ताबडतोब कारवाई केली मात्र स्टैण्ड परिसरातील ईतर अतिक्रमणे तशीच ठेवली होती शहरातील विविध रस्त्यावर आलेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे वाढलेली असताना नगर पालिका सत्ताधारी व प्रशासन मूग गिळून गप्प आहेत काही बड्या धेन्डानी तर मोकळ्या शासकीय जागेवर अतिक्रमणे करुन ती भाड्याने दिली आहेत नागरिकांना अतिक्रमणाचा त्रास होत असताना सर्व नगरसेवक आक्रमक न होता मौन पाळून गप्प आहेत त्यांची चुप्पी अतिक्रमणाला पाठबल देत नाहीना अशी शंका नागरिकामधुन व्यक्त होत आहे.

यावर कहर म्हणजे स्टैंड समोरील ज्या हातगाड्यावर नगर पालिकेने कारवाई केली होती त्या हातगाड्यांना चक्क एसटी स्टँडच्या रिंगरोड वरील पूर्वेकडील नव्याने सुरू करण्यात आलेल्या पूवेच्या गेटच्या परिसरात नगर पालिकेने गाडे लावण्यास परवानगी दिली यामुळे फलटण शहरात या भोंगळ कारभाराची चर्चा रंगली आहे. फलटण नगर पालिका अतिक्रमण विरोधी कारवाई करत आहे की अतिक्रमणे वाढण्यास प्रोत्साहन देत आहे? या मध्ये बरंच काळ-बेर असल्याच्या संशय व्यक्त होत आहे.

फलटण शहर हे स्मार्ट सिटी म्हणून उदयास येणार असल्याचे सांगण्यात येत आहे तर आता स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी खूप मोठी मोहीम आखली आहे पण अनेक बड्या लोकांनी अक्षरशः रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले असताना त्याच्यावरती कोणच कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर या मागे कोण कारवाईसाठी प्रशासनाला पुढे येऊ देत नाही का असाही संशय नागरिकामधुन व्यक्त होत आहे

सध्या बड्या धेंडांनी व काही अकार्यक्षम बिल्डरांनी तर फलटण शहराची वाट लावून टाकली आहे नगरपरिषदच्या बांधकाम विभागाच्या नगर अभियंता पदावरती पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे याचा सुळसुळाट झाला आहे. सध्याचे मुख्याधिकारी यांनी या पूर्वी शिर्डी या आंतरराष्ट्रीय ओळख असणाऱ्या ठिकाणी काम केले तेथे तसेच सांगोला येथेही त्यांनी धड़ाकेबाज मोहिम आखत अतिक्रमणे उध्वस्त केली होती मग फलटण मध्येच ते हाय का खात आहेत असा प्रश्न फलटणकर विचारत आहेत.


 रिंगरोडवरती एका दुचाकी विक्री व्यावसायिकाने अनेक महिन्यापासून विनापरवाना रस्त्यावर मंडप टाकून व्यावसाय थाटला आहे हा अनधिकृत मंडपास कोणाचा आश्रय आहे व कोणास यातून मलिदा मिळत आहे हा उलगडा होणे गरजेचे आहे. अशाच अतिक्रमणाचे अनेक सर्वसामान्य नागरिक बळी ठरत आहे. रस्त्यावरील टाकलेला मंडपावर कर वसुली करून नगर पालिकेने कारवाई करावी.


क्रांतिसिंह नाना पाटील चौकात काही महिन्यांपूर्वी सायकलस्वार, विद्यार्थिनी व कालचा पृथ्वी चौकातील बळी तर काही दिवसांपूर्वी शॉक लागून महिलेचा बळी हे सर्व गेलेले बळी हे अतिक्रमणाचे बळी आहेत. नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि नगरसेवक अनास्था दाखवित गप्प बसल्याने आणखी किती बळी या शहरात जाणार एखाद्याचा आणखी बळी गेल्यास नगरपालिका आणि नगरसेवक जबाबदारी घेणार का असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment