दौंडेवाडी जानुबाई मंदीरप्रश्‍नी नाहक बदनामी नको : गायकवाड - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, January 11, 2018

दौंडेवाडी जानुबाई मंदीरप्रश्‍नी नाहक बदनामी नको : गायकवाड



वडूज @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
दौंडेवाडी (ता. खटाव) येथील जानुबाई मंदीराच्या जागेप्रश्‍नी विरोधकांनी नाहक बदनामी करु नये असे आवाहन माजी सरपंच अनिता गायकवाड व त्यांचे पती चंद्रकांत गायकवाड यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकातील माहिती अशी, दौंडेवाडी येथील सिटी सर्व्हे नं. 1118 ही मिळकत चंद्रकांत शिवराम गायकवाड, संपत दगडू गायकवाड, श्रीरंग दगडू गायकवाड यांच्या वडिलार्जीत मालकी वहिवाटीची आहे. सदर जागेत पूर्वी गायकवाड कुटुबियांच्या खासगी मालकीचे जानुबाई मंदीर होते. सदर मंदीर व जागेशी गावातील इतर नागरीकांचा कायदेशीर संबंध नाही. मंदीराच्या जागेत व्यवस्थापक म्हणून श्रीरंग दगडू गायकवाड यांची रितसर नोंद आहे. सदर मंदीर कालांतराने जुने झाले होते. त्या ठिकाणी मंदिराचे कोणतेही अस्तित्व सद्या नाही
सर्व्हे नं. 1118 लगत असणार्‍या 1119 ते 1121 या मिळकती श्रीरंग दगडू गायकवाड यांच्या मालकीच्या आहेत. 1118 मिळकत क्षेत्रातील 30.6 चौ.मी. एवढे क्षेत्र आजही अस्तित्वात आहे. सदर जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम झालेले नाही. ग्रामस्थांनी अन्य जागेवर जानुबाई मंदीर, महादेव मंदीर, गणेश मंदीर यांची प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन केले आहे. सौ. अनिता गायकवाड या 25/8/2005 ते 24/8/2010 या कालावधीत सरपंच म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांनी 2012 साली मंदीराची जागा स्वत:च्या कुटुंबियांच्या नावावर नोंद केली. असे म्हणणे खोटारडेपणाचे आहे. त्यामुळे संबंधितांनी यापुढच्या काळात आमची नाहक बदनामी थांबवावी. अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशाराही त्यांनी पत्रकात दिला आहे

No comments:

Post a Comment