सि.कुरोली @ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
कुरोली येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कँप मध्ये ना.शेखरजी चरेगावकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. आधी ध्येय निश्चित करुन मग त्या दिशेने वाटचाल करा, आणि ही वाटचाल करत असताना अब्दुल कलामांसारखे आदर्श डोळ्यासमोर ठेवा असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, जिल्हा बँकेचे सदस्य अनिल देसाई उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानाची माहिती मान्यवरांनी घेतली. गावातील जलसंधारणाची कामे करणाऱ्या सारथी सामाजिक विकास संस्थेस आवश्यक ती मदत करण्याचे अश्वासन चरेगावकर साहेबांनी दिले.
कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, महाविलयाचे प्राध्यापक तसेच कुरोली गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर ना.चरेगावकर साहेबांनी सपत्निक श्री सिध्देश्वराचे दर्शन घेतले व पुढील दौऱ्यास ते रवाना झाले.
No comments:
Post a Comment