संदीप डाकवे, तळमावले @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सावंतवाडी....पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील जिंती-उमरकांचन येथील छोटीषी लोकवस्ती. उन्हाळा सुरु झाला की या गावाला तीव्र पाणीटंचाईला तोंड दयावे लागते. त्यांच्या पाणीटंचाईची ही साद ऐकली ती मुंबईस्थित श्री विजय आचार्य पे्रमसुरीष्वरजी जैन मानसेवा मंडळ व जेएमस ग्रुप यांनी. त्यांनी सावंतवाडी या गावाला भरीव योगदान दिले आहे. बोअरवेल, पाण्याची टाकी, घरटी नळ व पाईपलाईन देवून सावंतवाडीची पाण्याची तहान भागवली आहे.
श्री विजय आचार्य पे्रमसुरीष्वरजी जैन मानसेवा मंडळ व जेएमस ग्रुप यांचा कृतज्ञता सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला पाहूणे म्हणून सौ.सुभद्रा पाटील (सरपंच), भरत पाटील (उपसरपंच), सुमित मेहता, प्रतिक मारडिया, आतीष षहा, भावेष जैन, कुषल जैन, धर्मेंद्र जैन, दिनेष जैन आणि मंडळाचे सभासद उपस्थित होते.
श्री दुर्गामाता प्रगती मित्र मंडळाचे सभासद विजय बबन सावंत यांनी याकामी मंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करुन मंडळाचे संस्थापक कुमार सावंत यांनी गावाची पाण्याची समस्या सांगून ती कषा प्रकारे सोडवता येईल याची माहिती देवून ती पूर्णत्वास आणली. ऐन उन्हाळयाच्या पूर्वी पाण्याची सोय झाल्याने सावंतवाडी ग्रामस्थांच्या चेहÚयावरून आनंद ओसांडून वाहत होता. ग्रामस्थांनी पाहूण्यांचे मनापासून आभार मानले.
मुंबईवरुन आलेल्या पाहुण्यांची भव्य मिरवणूक काढत दैदिप्य विजय कांबळे या विद्यालयातील विद्याथ्र्यांनी झांजपथक, लेझीम, ढोल पथकाच्या, वाद्यांच्या गजरात स्वागत केले. या अनोख्या स्वागताने मुंबईकर भारावून गेले. त्यांनाही आपण योग्य ठिकाणी मदत केल्याने समाधान वाटले. सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी सुमित मेहता, कुंभार सर यांनीही आपली मनोगते व्यक्त करत श्री विजय आचार्य पे्रमसुरीष्वरजी जैन मानसेवा मंडळाच्या व श्री दुर्गामाता प्रगती मित्र मंडळ दुर्गामाता मंडळाचे कार्याचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमास यषस्वी करण्यासाठी श्री दुर्गामाता प्रगती मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ सावंतवाडी यांनी विषेश परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कुमार सावंत यांनी मानले.
0 Comments