Ticker

6/recent/ticker-posts

बाळू खंदारे सापडला, पोलिसांनी पकडला


सातारा @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कोजागिरी पोर्णिमेदिवशी सुरुची बंगल्यावर झालेल्या राड्यातील तीन महिन्यांपासून फरारी असलेला संशयित आरोपी नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे बुधवारी सायंकाळी  साता-यामध्ये आल्याची माहिती पोलीसाना मिळाली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी सापळा रचून आरटीओ कार्यालय परिसरात बाळू खंदारेला ताब्यात घेतले.
 आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन हस्तांतरावरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये सुरुचि बंगल्यासमोर कोजागिरी पोर्णिमेदिवशी धुमश्चक्री झाली होती. यात शाहूपुरी पोलिसांनी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह ३०० जणांवर गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी दोन्ही राजे समर्थकांची धरपकड सत्र सुरू केले होते.

तेव्हापासून शिवेंद्रसिंहराजे समर्थक बाळू खंदारे फरारी होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने तो फेटाळल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान सावकारी प्रकरणी मोक्का दाखल असलेल्या खंड्या धाराशिवकर टोळीशी खांदारेचे कनेक्शन असून बाळू खंदारे यालाही मोक्का लावण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याची रवानगी पुणे येथील मोक्का तुरुंगात होण्याची शक्यता असून त्याला जमीन मिळणे अशक्य असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Post a Comment

0 Comments