Ticker

6/recent/ticker-posts

ब्लूम इंग्लीश मिडियम स्कूल, गुणवरे येथे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा

फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क :- ग्रामीण भागात अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करुन सुसज्ज प्रशस्त इमारती, साधने सुविधांसह प्रशिक्षीत शिक्षकवर्गाद्वारे दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्याचा ईश्‍वर कृपा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावडे कुटुंबीयांनी केलेला यशस्वी प्रयत्न कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. 

       प्रारंभी संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात संस्था व प्रशाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. संभाजीराव गावडे यांनी विद्यार्थ्यांनी विविध क्रिडा स्पर्धेत मिळविलेले यश निदर्शनास आणून देत विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्याध्यापक गिरीधर गावडे यांनी विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी/विद्यार्थीनींचा परिचय करुन दिला. 

       यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. उषादेवी गावडे, विश्‍वासदादा गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गावडे, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, पुणे जिल्हा परिषद सदस्य पोपटराव खोमणे, सातारा जिल्हा सहकार बोर्ड संचालक सोमनाथ गावडे, सरपंच सौ. संगीता नाळे आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास बाळासाहेब गौंड, शिवाजीराव लंगुटे, तुकाराम गावडे, जयवंत मुळीक, शशिकांत आढाव, युवराज गौंड, विठ्ठल गौंड, रामदास गौंड यांच्यासह पालक, शिक्षक, विद्यार्थी  उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन संभाजीराव गावडे यांनी केले. 

Post a Comment

0 Comments