२०१७ पर्यंत बंधा-याचे काम तुमच्या दादांना का करता आले नाही ? आमदार शंभूराज देसाईंचे कार्यकर्ते राष्ट्रवादी विरोधात आक्रमक - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, January 13, 2018

२०१७ पर्यंत बंधा-याचे काम तुमच्या दादांना का करता आले नाही ? आमदार शंभूराज देसाईंचे कार्यकर्ते राष्ट्रवादी विरोधात आक्रमक



ढेबेवाडी @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
दादाचा पुळका आणणा-योंनो यालाच म्हणायचे खोट बोल पण रेटून बोल. तत्कालीन जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन तुमच्या दादांनी २००८-२००९ ला आमदार नसतानाही खळयाच्या बंधा-याकरीता निधी मंजुर करुन आणला होता तर तुमचेच दादा २००९ ते २०१४ पर्यंत या तालुक्याचे आमदार होते. मग या पाच वर्षाच्या काळात तुमच्या दादांना या बंधा-याचे काम का पुर्ण करुन घेता आले नाही. आज २०१८ उजाडले आहे याचे तरी भान ठेवा. आमचे नेते आमदार शंभूराज देसाईसाहेब यांच्यामध्ये धमक असल्यानेच त्यांच्याच काळात बंधा-याचे काम सुरु झाले असून न केलेल्या कामांचे श्रेय घेणे राष्ट्रवादीकरोंनो तुम्हीच बंद करा. असा प्रतिटोला खळे गावातील आमदार शंभूराज देसाईंचे समर्थकांनी या विभागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रसिध्दीपत्रकाव्दारे लगावला आहे.
ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादीच्या विशेषत: माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचा पुळका आणणा-यांनी खळे बंधा-यांच्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा जो देखावा लावला आहे. त्याला आमदार शंभूराज देसाई यांच्या खळे गावातील समर्थकांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
आमदार शंभूराज देसाई यांच्या समर्थकांनी पत्रकात म्हंटले आहे की, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर हे आमदार नसताना त्यांनी पाठपुरावा करून २००८-२००९ ला खळे गावातील नदीवरील केटीवेअर बंधारा बांधकामासाठी निधी मंजूर करून आणला असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. त्यांच्या समर्थकांना एवढेही भान राहिले नाही आज २०१८ साल उजाडले आहे. तुमच्या दादांनी सन २००८-२००९ ला या कामांसाठी तत्कालीन जलसंपदामंत्री यांचेकडे पाठपुरावा करुन या कामासाठी निधी आणला असेल तर लगेचच झालेल्या २००९ च्या विधानसभा निवडणूकीत काठावर ५८० मतांनी तुमचेच दादा आमदार झाले होते त्यांना २००९ नंतर २०१४ पर्यंत या बंधा-याचे काम पुर्ण करुन घेण्यास पाच वर्षाचा कालावधी त्यांच्याजवळ होता. मग या पाच वर्षात या बंधा-याचे काम तुमचे दादा का पुर्ण करु शकले नाहीत याचे उत्तर पहिल्यांदा दादांचा पुळका आणणा-यांनी या विभागातील जनतेला दयावे. अहो खोट बोलायचे पण किती ? याचे तरी भान ठेवा. माजी आमदारांप्रमाणे तुम्हीही खोट बोल पण रेटून बोल.ही घेत असलेली भूमिका आपल्या विभागाच्या दृष्टीने हानीकारक आहे.२००९ ला आमदार झालेल्या पाटणकरदादांना महाराष्ट्रात व दिल्लीत आघाडी शासनाची सत्ता असतानाही खळे बंधाऱ्याची एक वीटही का हलविता आली नाही ? पाच वर्षे नुसते जनतेला झुलवत ठेवले आणि आता आमचे नेते आमदार शंभूराज देसाईसाहेब यांच्या प्रयत्नातून बंधा-याचे काम पुर्ण होत आहे हे दिसायला लागले की पाटणकर दादांप्रमाणे आले फुकटचे श्रेय घ्यायला. ज्यांना दहा वर्षांपासून खळे गावातील ग्रामपंचायत व सेवासोसायटीची सत्ता राखता आली नाही जनतेने गावातील विकासकामाचा लेखाजोखा ओळखून आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले त्यांमुळे विरोधकांनी आम्हाला श्रेयवादाचे राजकारण शिकवु नये जर त्यांना एवढाच उन्माद असेल तर येणार्‍या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्यांची धमक आणि ताकद किती आहे हे आम्ही दाखवून देवू असा निर्वाणीचा इशारा देत कुंभारगाव जि प मतदारसंघ हा आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्लाच राहणार आहे. खळे गावातील ग्रामपंचायत व सेवा सोसायटी व ग्रामस्थ गेल्या दहा वर्षापासून आमदार शंभूराज देसाईसाहेब यांना मानणारे आहेत खळ्याच्या जनतेने त्यांच्यावर अलोट प्रेम केले आहे त्याचेच प्रतीक म्हणून तिसऱ्यांदा या बंधा-याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते आम्ही करुन घेतले आहे कारण आम्हाला आणि तुम्हालाही माहिती आहे की, खळे बंधा-यांचे काम पुर्ण करुन घेण्याचे धमक आणि ताकद फक्त आणि फक्त आमदार शंभूराज देसाई यांच्यामध्येच आहे. आमदार शंभूराज देसाईसाहेब खळे गावात आले आणि भूमिपुजन करुन गेल्यानंतर प्रत्यक्षात बंधा-याच्या कामालाही सुरुवात झाली. तुमच्या दादासारखे आमच्या साहेबांना या बंधा-याचे काम पुर्ण करुन घ्यायला १० वर्षे लागणार नाहीत असा टोलाही त्यांनी पत्रकात लगाविला आहे. पत्रकावर खळे गावचे सरपंच संदीप टोळे,सेवा सोसायटीचे माजी चेअरमन गजानन कचरे व शंभुराज युवा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल कचरे, महादेव कचरे,नामदेव कचरे यांच्या सह गावातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या सहया आहेत. 


No comments:

Post a Comment