माळशिरस@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा - लातूर या रस्त्यावर येणाऱ्या माळशिरस परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याच्या रुंदीकरणात जात आहेत. यात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता अत्यंत चुकीच्या पद्धतीने पोलिसांना हाताशी धरून रस्त्याचे काम केले जात आहे. म्हणून या प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध व्यक्त करण्यासाठी नुकताच माळशिरस परिसरातील शेतकऱ्यांचा जनआक्रोश माळशिरसच्या रस्त्यावर एकवटून प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला.
रस्ता सरकारी नाही खाजगी टोलनाक्याचा :काॅ. शशी सोनवणे -
हा रस्ता पुर्वी सरकारकडे होता. आता या रस्त्याचे काम खाजगी कंत्राटदार करतायत म्हणजे या तयार रस्त्यावर टोलनाका बसून यांची वसुली करणार आहे. म्हणूनच हा रस्ता खाजगी तर मग तुमच्या जमीनी संपादित केल्याशिवाय हा रस्ता करता येणार नाही. ही भूमिका काम करणाऱ्या संबंधीत सरकारी व खाजगी एजन्सीने घेतली पाहिजे. नाहीतर हा रस्ता जागीच थांबले पाहिजे. जर पुढील काळात शेतकऱ्यांना दडपणाखाली घेऊन रस्त्याचे काम सुरू केले तर याचे गंभीर परिणाम संबंधितांना भोगावे लागतील.असा ईशारा काॅ. शशी सोनवणे यांनी दिला.दडपशाही करण्याऱ्या पोलिसांचा निषेध : डाॅ प्रमोद गावडे
यावेळी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना बेलभंडारा विचार मंचचे अध्यक्ष डाॅ. प्रमोद गावडे म्हणाले की, या परिसरातील शेतकऱ्यांना तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला तुरूंगात टाकतो. अशा धमक्या येथील पोलीस अधिकारी शेतकऱ्यांना देत आहेत.एवढेच नाही तर तुम्हाला मोर्चा काढता येत नाही. म्हणून या शेतकर्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न केला गेला. ही बाब लोकशाहीच्या कल्याणकारी राज्यात अत्यंत निंदनीय आहे. म्हणून पोलिसांनी यात पडू नये. जर पडलेच तर त्यानी त्याचे कायदा व्यवस्थापनाचे काम निट करावे. अन्यथा हा जनतेचा आक्रोश खूप वाढत जाईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी कायद्याला कुठेही गालबोट न लावता आपला न्याय मागणीचा आवाज बुलंद केला पाहिजे.
या मोर्चाची सुरूवात माळशिरस नगरीचे ग्रामदैवत मारूती मंदिरापासून करण्यात आली. यावेळी मोर्चेकऱ्यांना शेतकरी आंदोलनाचे समन्वयक साथी बालाप्रसाद किसवे काॅ. दयानंद कनकदंडे, माळशिरस कृती समितीचे डाॅ. दत्तात्रेय सर्जे, बाधीत शेतकर्यांचा बुलंद आवाज दादासाहेब हुलगे, संजय वाघमोडे,यानी मोर्चेकऱ्यांना संबोधीत केले.यावेली महादेव वाघमोडे, विठ्ठल बंडगर,आजिनाथ करणावर पाटील, म्हसवड आंदोलनाचे प्रमुख लिंगापा मासाळ, निशिकांत जितकर , यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. शेवटी नायब तहसीलदार यांनी गेटवर येवून निवेदन स्वीकारले. यावेळी मोर्चात सहभागी सर्व शेतकऱ्यांचे आभार माळशिरस शेतकरी आंदोलनाचे समन्वयक साथी विठ्ठल बंडगर यांनी मानले. मोर्चाचे शांततेत विसर्जन झाले.
No comments:
Post a Comment