Hot Posts

6/recent/ticker-posts

डान्सबहादरांना न्यायालयाचा दणका, जामीन दिला पण....


सातारा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
जामीन मिळणार या आनंदात जिल्हा रुग्णालयाच्या पिझन वॉर्डमध्ये डान्स करणार्‍या बहादरांना सोमवारी न्यायालयाने चांगलाच दणका दिला. त्यांना जामीन दिला पण, सातार्‍यात राहता येणार नाही यासह अनेक अटी कोर्टाने घातल्या आहेत.  अजून काहीदिवस तरी या सगळ्यांना आपल्या घरी जाता येणार नाहीय.
पाचवे जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.एस अमेठा यांनी सशर्त जामीन मंजुर  केला. तपासी अधिकार्‍यांना रोज रोज कोठे आहे याची माहिती मोबाईलव्दारे बंधनही घालण्यात आले आहे.
कोजागिरी पौर्णिमेदिवशी सुरुचि बंगल्यावर झालेल्या राड्याप्रकरणी सुमारे  250 जणांवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. खासदार उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थकांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आत्ता पर्यंत 12 जणांना अटक केली आहे. 6 जणांना जामीना मिळणे बाकी होते. यामध्ये उदयनराजे समर्थक बाळासाहेब ढेकणे, इम्तियाज बागवान,  किरण कुर्‍हाडे,  विक्रम शेंडे, केदार राजेशिर्के व विशाल ढाणे यांचा समावेश होता.
शिवेंद्रसिंहराजेंच्या समर्थकांना जामीना मिळताच आता आपला सुध्दा जामीन होणार या आनंदात सहा जणांनी जिल्हा शासकीय रूग्णालयातील आरोपीकक्षातच डान्स केला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
तपासी अधिकारी पोलीस उपअधिक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी न्यायालयात या आरोपींना जामीन देवू नये असा अहवाल दिला होता.
त्यानुसार सोमवारी न्यायालयाने या सहा आरोपींचा जामीन मंजुर करतानाच त्यांना तातडीने जिल्हा सोडण्याचे आदेश दिले. तसेच ते कोणत्या जिल्हयात कुठे आहेत याची रोजच्या रोज माहिती मोबाईलव्दारे तपासअधिकर्यांना देण्याचे बंधन ही त्यांच्यावर घालण्यात आले.
सरकारपक्षा तर्फे अ‍ॅड. मुके, मिलिंद ओक यांनी तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड.धैर्यशील पाटील व ताहेर मणेर यांनी काम पाहिले

Post a Comment

0 Comments