फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्व साधारण सभेत फलटण शहराच्या दृष्टीने महत्वपुर्ण असणार्या भुमिगत गटार योजनेसह 4 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. सफाई कामगार ठेक्यावरून झालेला वाद वगळता सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्षा निताताई नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या सभेला मुख्याधिकारी धैर्यशिल जाधव उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे,श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, अजय माळवे, मधुबाला भोसले आदीसह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
फलटण शहराच्या दृष्टीने महत्वपुर्ण असणार्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान(राज्यस्तर) योजनेतुन मंजुर झालेल्या भूमिगत गटार योजनेच्या ई निवेदेला तत्वता मंजुरी देण्यात आली यावेळी प्रभाग क्र. 3,4,5,11 या प्रभागातील राहीलेल्या भागाचा समावेश यात करण्याची सुचना नगरसेवक अशेाकराव जाधव यांनी मांडली तसेच वाढीव इस्टीमेटवर विरोधी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रविण आगवने, सचिन अहीवळे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले साहीत्याच्या लिड चार्जेसाठी 3 कोटी 55 लाखाच्यावर रक्कम अदा करणे अयोग्य असुन ही रकक्म कमी करावी अशी मागणी केली यावर हे इस्टीमेट मजीप्रा यांनी केले असुन परत यात बदल करणेसाठी त्यांनी 38 लाख रू फी आकारली जाईल असे सांगितले यावर मजीप्राच्या अधिकार्यांनी याबाबत आपण सविस्त टीपणी दिली असल्याचे सांगितले.
लोकशाहीर आण्णा भाऊसाठीे नागरी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत शहरातील विविध 11 रस्त्यांना तसेच आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत असलेल्या कामाना मंजुरी देण्यात आली. यावळी सफाई कामगार ठेका हा पुर्वी असलेल्या ठेकेदारालाच देण्यावर नगरसेवक अनुप शहा, समशेरसिंह निंबाळकर यांच्या सह रघुनाथराजे नाईक निांबळकर यांनीही अक्षेप घेतल्यांन वातावरण चांगलेच तापले सदर ठेकेदारावर न्यायालयीन वाद सुरू असुन संबधित ठेकेदार कामगारांचे पैसे वेळेत देत नाही पीएफचे पैसे भरत नाही तरीही यांलाच ठेका का देता असा आक्षेप विरोधकांनी घेतल्यावर सत्ताधारी गटाचे गटनेते रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनीही संबधित ठेका रद्द करण्याची मागणी केली पण मुख्यधिकार्यांनी स्वच्छता अभियान सुरू आहे अशा वेळी ठेकेदार बदलणे अडचणीचे होईल नवीन टेंडर काढे पर्यत सदर ठेका सुरू ठेवण्याच्या अटीवर हा ठराव मंजुर झाला.
सफाई कामगार मधील 46 कामगार हे नगर पालिका ऑफीस मध्ये काम करीत असल्याचे समशेरसिंह यांनी निदर्शनास आणु देताच आवश्यक कामगारांना पात्रते नुसार काम देवुन ऑफीस मधील कामगार कमी करण्याची मागणी केली ईतर कामगारांना संबधित विभागात वर्ग करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. आरोग्य, पाणी पुरवठा व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती विधानपरिषद व आमदार यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अतंर्गत विविध 5 कामांना मंजुरी देण्यात आली. फलटण नगर परिषदेच्या शाळा क्र 2 व शाळा क्र 5 याठी शौचालय, संरक्षक भिंत, बाथरूम बांधणेच्या कामाला मंजुरी देण्यात आली.
0 Comments