Ticker

6/recent/ticker-posts

‘शिवसमर्थ’ मुळे प्रवाशांना मिळाला निवारा


तळमावले@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
ढेबेवाडी-कराड महामार्गावर कोळे हे श्री घाडगेनाथाचे देवस्थान प्रचलित आहे. अनेक ठिकाणचे भाविक भक्त या ठिकाणी श्री घाडगेनाथाच्या दर्शनाला येत असतात. या ठिकाणी रथसप्तमीनंतर भरणारा उरुस हा परिसरामध्ये प्रसिध्द आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकांची गर्दी कायम असते. शिवसमर्थ मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी आणि ग्रामपंचायत कोळे यांच्या सहायाने कोळे बसस्थानकाचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. यावेळी कोळे गावच्या सरंपच सुष्मा कांबळे, उपसरपंच अशोक शिनगारे, घाडगेनाथ मठाचे मठाधिपती बाबासाहेब वाणी, कोळे विकास सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव चव्हाण, पोलीस पाटील प्रिया देशमुख, सुदाम फिरंगे सर, अविनाश पाटील, वसंत देसाई, महेश स्वामी, शांताराम चव्हाण, काशिनाथ पवार,  विकास खडके, समीर नदाफ, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.जनार्दन बोत्रे, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, देवबा वायचळ सर, सुनील ढेंबरे, नानासाहेब सावंत, सदानंद लोहार, यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोळे या ठिकाणाहून प्रवासाला जात असताना वाहनांची वाट पाहत असताना प्रवाशांना उन्हात, पावसात उभे राहावे लागत होते. विशेषकरुन विद्यार्थी वर्ग, महिला, वरीष्ठ नागरिक यांना खूपच त्रास होत असे. ही गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी बस थांबा असणे गरजेचे होते. ही गरज ओळखून कोळे ग्रामपंचयातील मधील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी या ठिकाणी थांबा उभारण्याचे ठरवले. व तसा प्रस्ताव शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अ‍ॅड.जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांच्या कडे मांडला. त्यांनी या ठिकाणची पाहणी केली तसेच प्रवाशांची गरज ओळखून थांबा तयार करण्याचे ठरवले. शिवसमर्थ मल्टीस्टेट संस्था व शिवसमर्थ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा थांबा करुन प्रवाशांची सोय करण्याचे ठरवले. आणि तो पूर्ण देखील केला.
दरम्यान शिवसमर्थ संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत जळीतग्रस्तांना मदत, गुणवंत विद्यार्थी सत्कार, होतकरु गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याची मदत, अल्प दरात 24 तास रुग्णवाहिका सेवा असे उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे जनमानसात शिवसमर्थ ची वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे.
समाजातील अडीअडचणींच्यावेळी लोकांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहत असलेल्या शिवसमर्थ ने उभा केलेल्या बसस्टॉप चे सर्वांकडून कौतुक होत आहे.

शिवसमर्थ जपतेय सामाजिक बांधिलकीचा वसा 

शिवसमर्थ परिवाराने लोकांची गरज ओळखून अल्पावधीत निवारा शेड उपलब्ध करुन दिले. त्यामुळे येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांना हक्काचा निवारा मिळणार आहे. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अ‍ॅड.जनार्दन बोत्रे यांचे व संस्थेचे मी कोळे ग्रामस्थांच्या वतीने आभारी आहे.
-सुषमा राजेंद्र कांबळे, सरपंच कोळे  

Post a Comment

0 Comments