तळमावले@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कोळे येथील उत्सवानिमित्त दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड तळमावले यांचे वतीने श्री घाडगेनाथ ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोळे गावच्या सरंपच सुष्मा कांबळे, उपसरपंच अशोक शिनगारे, घाडगेनाथ मठाचे मठाधिपती बाबासाहेब वाणी, अशोक वाणी, कोळे विकास सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव चव्हाण, पोलीस पाटील प्रिया देशमुख, सुदाम फिरंगे सर, अविनाश पाटील सर, वसंत देसाई, महेश स्वामी, शांताराम चव्हाण, काशिनाथ पवार, विकास खडके, समीर नदाफ, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, देवबा वायचळ सर, सुनील ढेंबरे, नानासाहेब सावंत, सदानंद लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री घाडगेनाथ योजनेत रु. 5,000/- ची ठेवपावती केल्यास त्यावर सर्वाधिक 13 टक्के व्याज देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम बक्षीस एलईडी टीव्ही, दुसरे बक्षीस कपाट, तिसरे बक्षीस चैन-सायकल, चौथे बक्षीस-इलेक्टॉनिक शेगडी, पाचवे बक्षीस-चार्जींग शेती पंप, सहावे बक्षीस-मिक्सर 5 नग, सातवे बक्षीस-टेबल फॅन 5 नग, आठवे बक्षीस-कुकर 5नग, नववे बक्षीस- इस्त्री 5 नग अशी 25 आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
अॅड. जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांनी दि. 15 ऑगस्ट 2006 रोजी शिवसमर्थ सहकारी पतसंस्थेची तळमावले येथे स्थापना केली. तद्नंतर शासकीय नोकरीत 25 वर्षे घालवून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ सहकार क्षेत्र निवडले. यात सहकार क्षेत्रातून त्यांनी सहकार्याचा हात पुढे करत अनेकांचे संसार फुलवण्याचे काम करत आहेत.
हे करत असताना समाजाविषयी असणारी प्रचंड तळमळ आणि आस्था त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात सुरवात केली. ग्रामीण व ×ाहरी भागामध्ये संस्थेचे रोपटे वाढवण्यास सुरुवात केली. आज ग्रामीण भागामध्ये तळमावले, मलकापूर कराड, मल्हारपेठ, ×ोडगेवाडी, सणबूर, मान्याचीवाडी, पाटण, कोल्हापूर, विटा, मोरगिरी, काळगांव, कोळे, रविवार पेठ कराड, विद्यानगर कराड, खानापूर जि.बेळगांव आणि शहरी विभागामध्ये चंदनवाडी-मुंबई, कांदिवली, कोपरखैराणे, उल्हासनगर, भायंदर, लालबाग, वांद्रे या ठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत.
स्वच्छ, पारदर्×ाक कारभाराने लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेने अवघ्या 11 वर्षात 22 शाखांसह 132 कोटी ठेवींची उलाढाल केली आहे. संस्थेने चांगला नावलौकीक प्राप्त केला आहे. 365 दिवस अविरत सेवा कार्यरत असते. संस्थेने आतापर्यंत ज्या काही लकी ड्रॉ च्या योजना राबवल्या आहेत. त्या अत्यंत पारदर्शकपणे राबवल्या आहेत. त्या योजनांमध्ये पुढीलप्रमाणे बक्षीसे सभासदांना दिली गेली आहेत. टाटा नॅनो-2, रोटावेअर-1, मोटार सायकल-7, स्कुटी-7, सुवर्णालंकार-15, स्टील कपाट-2, रेस सायकल-4, लॅपटॉप-1, कॉम्प्युटर-5, जेन्टस सायकल-25, लेडीज सायकल-25, घरघंटी-3, फ्रीज-4, वॉशींग मशीन-7, पिको फॉल मशीन-1, डायनींग टेबल-1, सोफासेट-1, मोबाईल-2, टॅब-2, सौर दिवा-2, कडबाकुट्टी-1 इलेक्टॉनिक शेगडी-6, एलईडी टीव्ही-1, टीव्ही-5, कॅमेरा-1, ए.सी.-1, मिक्सर-5, वॉटर कुलर-1, शिलाई मशीन-25, चार्जींग औषधाचा पंप-1, शेती पंप-25, डिजीटल घडयाळ-2, इर्मजन्सी लाईट-10, होमथिएटर-1, प्रेशर कुकर-10, हॉट टिफीन बॉक्स-75, चहाचे थर्मास-25, टेबल पंखा-5, डिनर सेट-5, दुधाची किटली-3, जेन्टस घडयाळ-4, लेडीज घडयाळ - 4, फ्रॉय पॅन सेट-5 अशी अत्यंत आकर्षक आणि उपयुक्त बक्षीसे दिली आहेत. याच धर्तीवर संस्थेने अन्य योजना सुरु केल्या आहेत.
वरील ठेव योजनेमधील बक्षीसांचे भाग्यवान विजेते ठरण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अॅड.जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांनी केले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौस्तुभ काळे, योेगेश जाधव, स्वाती पाटील, सौरभ देसाई, सागर गरुड व सर्व कर्मचारी, संचालक सल्लागार यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments