Ticker

6/recent/ticker-posts

प्रेरणा मतीमंद मुलांचे पुनर्वसन केंद्र म्हसवड येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात


वरकुटे-म्हसवड @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड येथे नलीनी फौडेशन संचलीत प्रेरणा मतीमंद मुलांचे पुनर्वसन केंद्र म्हसवड येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मतीमंद मुलांनी खाऊ वाटप करण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोपानदेव सामाजीक संस्थेचे अध्यक्ष महादेव सरतापे, बाळासाहेब मुलाणी,डाॅ.सागर सावंत यांनी  आपली मनोगते व्यक्त केलीे. नलीनी कोळी मॅडम यांच्या फौडेशनच्या शाळेस भेट दिल्याबद्दल त्यांनी सर्वप्रथम उपस्थितांचे आभार मानले.

     यावेळी नलीनी कोळी म्हणाल्या की प्रेरणा मतीमंद मुलांचा केंद्राची स्थापना २६ जानेवारी २०१७ रोजी झाली, सुरवातीचा काळात या शाळेत १५ मुले शिक्षण घेत होती. त्यानंतर १ वर्षाच्या कालखंडात विद्यार्थींची संख्या वाढुन ३५ झाली आहे.

         तसेच या सर्व मुलांचे पालन पोषण नलिनी कोळी मॅडम स्वखर्चातुन करतात आहेत. या संस्थेसाठी लोकांनी विविध माध्यमातून मदत करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

या कार्यक्रमास म्हसवडचे नगरसेवक अकिल काझी, नगरसेवक संजय सोनावणे, माण तालूका विद्यार्थी काॅग्रेस चे अध्यक्ष पंकज पोळ, युवक नेते निलेश काटे,शिवसेनेचे राहूल मंगरूळे, शिवाजी केवटे सोमनाथ कवी तसेच भिमराव लोखंडे, अविराज गायकवाड, डाॅ.काटकर, व इतर मान्यवर मोठ्या संख्येन उपस्थीत होते.

प्रास्ताविक किर्तने सर यांनी केले व आभार दत्तात्रय कोळी सर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments