Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत वरकुटे-म्हसवड येथील ध्वजारोहण सरपंच छाया लोखंडे यांच्या हस्ते



वरकुटे -म्हसवड @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
69 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत वरकुटे-म्हसवड येथिल ध्वजारोहण सरपंच छाया लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. वॉटर कप मध्ये सहभाग घेण्यासाठी ग्रामसेवक वंजारी यांनी ग्रामस्थांना प्रोत्साहीत केले.ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्या नंतर श्री शंभू महादेव हायस्कूलच्या विद्यार्थींनी कवायती सादर केल्या, तसेच गुणवंतांचा पारितोषिक वितरण समारंभही घेण्यात आला. त्यानंतर खाऊ वाटप करण्यात आले. १४ व्या वित आयोगातुन गावातील ११२ अंगणवाडीच्या विद्यार्थींना शालेय गणवेश वाटप मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी वरकुटे-म्हसवडच्या नवनियुक्त पोलीस पाटील पदी अंकुश माने यांची तसेच माळवाडीच्या पोलीस पाटील पदी महेंद्र ठेगिंल व वाकीच्या पोलीस पाटील पदी महादेव साठे , माण तालुका अपंग कार्यकारणीच्या कार्याध्यक्षपदी सुनिल माने यांची निवड झालेबद्दल ग्रामपंचायत वरकुटे-म्हसवड यांच्या वतीने सत्कार करण्यात आले.

यावेळी माजी सभापती श्रीराम पाटील, उपसरपंच मारूती मोटे,ग्रामसेवक वंजारी आण्णा, गावकामगार तलाठी रसाळ, पञकार दिपक काटकर,सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक व हायस्कुल शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडीचे विद्यार्थी व शिक्षक तसेच पालक व ग्रामस्थांनी लक्षणीय उपस्थिती लावली.

Post a Comment

0 Comments