Ticker

6/recent/ticker-posts

भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका घेवून अन्यायाला वाचा फोडणार- अनिल देसाई


मोगराळे@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
मोगराळे ता माण येथे सोलर कंपनीने प्रकल्प उभे  केले आहेत मात्र भूमिपुत्रांना डावलून व कमी पगार देवून पिळवणूक सुरू आहे ,कंपनी व भूमिपुत्र यांच्या पगारात दलाल मालामाल झालेआहेत,दडपशाही धोरणामुळे कंपन्यांच्या विरोधात जनआंदोलन सुरू केले .बलाढ्य दलालांच्या दबावापुढे प्रशासकीय यंत्रणाही कुचकामी ठरली आहे असा आरोप करीत  मोगराळे गावात ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. आज या आंदोलनाला भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी भेट दिली व आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी भाजपच्या माध्यमातून ठामपणे उभे राहू अशी ग्वाही दिली.

आंदोलन कर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे,एनव्ही आर महासोलर प्रा.ली.,झेनिथ इंडस्ट्रीयल प्रा.ली.,परसेप्तसोलर एन्तरप्रायजेस, एशियन हॉटेल वेस्ट या चार कंपन्यांकडून शेतकर्याची फसवणूक झाली आहे सौर उर्जा प्रकल्प उभाकरताना  शेतकरी वाजमिना मालकांना कामावर ठेवण्याचे आश्वासन दिले होते मात्र कंपन्यांनी दलाल नेमले असल्याने हे दलाल कामगारांना कंपनीचा पगार थेट न देता दलाली घेवून पगार देत आहेत त्यामुळे भूमिपुत्रांवर मोठा अन्याय होत आहे.नेमलेल्या ठेकेदारांकडून कामगारांची पिळवणूक सुरु आहेत्यामुळे संपूर्ण मोगराळे  गावाने आंदोलन सूरु केले आहे.तसेच सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच उपोषण कर्त्यांना उपोषण करू नये म्हणून कंपनीच्या पाळलेल्या गुंडांच्या भमक्या येत आहेत.यांसदर्भात अनिल देसाई म्हणाले कोणत्याही गुंडांच्या धमकीला भिक घालू नका,दडपशाही दबावाला बळी पडू नका.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहून अन्यायाला वाचा फोडू असे आश्वासन दिले. आंदोलन सुरु असले तरी कोणतीही शासकीय यंत्रणा तिकडे फिरकलेली नाही. कंपन्यांचा दबाब राहीला असल्याने  सर्वसामान्यांना वाली राहणार नाही होत असलेल्या अन्यायाला वाचा कोण फोडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे या संदर्भात वभाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी भेट देऊन होत असलेल्या अन्यायाबाबत  भाजपच्या माध्यमातून वाचा फोडू, या निवेदनांच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील,कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर यांना माझे पत्र जोडून देणार असून या भूमिपुत्रांना  न्याय देण्याची भूमिका घेणार असल्याचे ठाम  आश्वासन दिले. भेटीवेळी जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक पिंटूशेठ जगदाळे,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप भोसले,भाजपा अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष मंगेश खरात आदी उपस्थित होते.

उपोषणाला महादेव जगदाळे,हिंदुराव जगदाळे,तुकाराम जगदाळे, संतोष जगदाळे,विनोद जगदाळे,रमेश सस्ते,महिलांसह संपूर्ण मोगराळे ग्रामस्थ बसले आहेत. त्यातील काहीची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments