Hot Posts

6/recent/ticker-posts

डाॅ.राजेंद्र खाडे यांच काम प्रेरणादायी : खा. पुनम महाजन





धामणी @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
पद असो वा नसो जनतेच्या अडीअडचणी जो सक्षम पणे सोडवतो तोच खरा कार्यकर्ता असतो त्याप्रमाणे भाजपचे सरचिटणीस डाॅ. राजेंद्र खाडे यांनी केलेली समाजोपयोगी कामे ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहेत असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. पुनम महाजन यांनी केल .
त्या धामणी , ता-माण येथे भाजपचे तालुका सरचिटणीस डाॅ.राजेंद्र खाडे यांनी  स्वखर्चातुन उभारलेल्या " लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्या वेळी त्या बोलत होत्या यावेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर,युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी अतुल कुमार , भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर , मा.आ.डाॅ.दिलीप येळगावकर , जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई , तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ , डाॅ.राजेंद्र खाडे , बाळासाहेब खाडे , पळशीचे सरपंच शंकर देवकुळे , चेअरमन महादेव खाडे , संतोष हिरवे , विष्णू खाडे आदी मान्यवर उपस्थित होते .
या वेळी खा. पुनम महाजन पुढे म्हणाल्या की कोणत्याही कार्यकर्त्याचे नाव महत्त्वाचे नसुन त्यांनी जनतेसाठी केलेल काम हे महत्त्वाचे असते त्या प्रमाणे डाॅ.राजेंद्र खाडे यांनी अनेक गावात उभारलेल्या स्वागत कमानी , दुष्काळात केलेला मोफत पाणीपुरवठा , अल्प दरात उपचार करणे तसेच शासनाकडुन अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत त्या बरोबर स्व .गोपीनाथ मुंडे व स्व.प्रमोद महाजन यांचे विचार जनमानसात पोहचवण्यासाठी ते सतत धडपडत असतात त्यामुळे त्यांच्या अशा कामाचा पक्षाला नक्कीच फायदा होऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच हे काम नक्कीच प्रेरणादायी ठरेल अस त्या म्हणाल्या . या वेळी डाॅ.राजेंद्र खाडे यांनी स्व खर्चातुन पळशी , धामणी , ढाकणी येथे प्रवेशद्वार उभारल्याबद्दल त्यांच कौतुक केल .

अन् खा. महाजन झाल्या भावुक !

धामणी येथे खा.पुनम महाजन यांच स्वागत करताना डॉ.राजेंद्र खाडे यांनी गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांचे फोटो असलेली फ्रेम भेट दिली असता त्या फोटो पाहुन भावूक झाल्या त्यावेळी त्यांचे डोळे पाण्याने पाणावले होते .

Post a Comment

0 Comments