वाकेश्वर @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
येथील महादेव जयसिंग जावीर यांच्या मालकीची सुमारे साडेसात हजार किमतीची शेळी लांडग्यांनी फस्त केली.
रविवार दि. 25 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वडूज रस्त्यावरील श्री. जावीर यांच्या राहत्या झोपडी वजा घरासमोर दोन शेळ्या व त्यांची कोकरे बांधली होती. अशावेळी अचानक आलेल्या लांडग्याने एका शेळीवर झडप घालत ठार केली. वनपाल राजेंद्र काशिद यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खाडे यांनी मृत शेळीचे शवविच्छेदन करुन अहवाल दिला आहे.
वनविभागाने लांडग्यांचा बंदोबस्त करण्याबरोबर आपद्ग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

0 Comments