दहिवडी @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
राज्यस्तरीय सब ज्युनियर क्रीडा स्पर्धेत माण तालुक्यातील सुरुपखानवाडी येथील प्रगती सुरेश जाधव हिने तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केले. या यशामुळे माण तालुका हा बुद्धीवंतांबरोबरच खेळाडूंची खाण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीस स्पोर्टस कॉम्प्लेस कळंबोली, रायगड येथे दि 24 व 25 रोजी राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्य. या स्पर्धेसाठी सातारा जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलॅटिक असोसिएशनच्यावतीने जिल्हा संघात प्रगती सुरेश जाधव हिची निवड करण्यात आली आहे
प्रगती जाधव ही सुरुपखानवाडी या ग्रामीण खेड्यातील विद्यार्थीनी आहे. तिने मिळवलेल्या यशा मध्ये तिला तिच्या वडिलाचे सुरेश शिवाजी जाधव व तिचे क्रीडा शिक्षिक याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल तिचे सुरुपखानवाडी ग्रामस्थानी अभिनंदन केले. व पुढील स्पर्धा साठी शुभेच्छा दिल्या.


0 Comments