पाटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
लक्ष्मण तुकाराम पवार (रा.गुरेघर ता.पाटण) हे शिद्रुकवाडी गावाशेजारी आपली गुरे, शेळ्या चारावयास गेले असता अचानक त्यांच्या जवळ असणाऱ्या शेळीवर बिबट्याने झडप घालून ठार केले. तरी वनविभागला त्यांनी कळविले असता वनकर्मचारी आम्ही रजेवर आहे असे उत्तर दिले. तरी मोरणा भागात काही दिवस झाले बिबट्याने दहशत माजवली आहे. त्यामुळे भागातील शेतकरी आपली गरे,शेळ्या बाहेर सोडण्यास घाबरत असून वन विभागाने यावर लक्ष केंद्रीत करून कायम स्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

0 Comments