Hot Posts

6/recent/ticker-posts

शंभू महादेव हायस्कुल वरकुटे-म्हसवड येथे दहावी विद्यार्थांचा निरोप समारंभ उत्साहात


वरकुटे-म्हसवड @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
आज श्री शंभू महादेव हायस्कुल वरकुटे-म्हसवड  येथील शाळेच्या १८ व्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थांना शुभचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमाण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी सभापती श्रीराम पाटील, प्रमुख पाहुने डी वाय एस पी अंकुश इंगळे, प्रसिध्द व्याख्याते व माजी प्राचार्य मधुकर कोथमिरे सर, मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव सर, उपसरपंच रघुनाथ माने, सुभाष जाधव, आण्णासो माने, रामचंद्र माने, वसंत माने, आनंदा गुरव,नवनाथ माने, प्रमोद माने, इकबाल मुलाणी, नितीन माने, विशाल इंगळे, संजय बनसोडे, अजित बनसोडे, धनराज दोलताडे, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 हायस्कुलच्या १३ व्या बॅचच्या निकाल १००% लागला असुन या परिक्षेत कु.अंकिता आण्णासो माने हिने हायस्कुलमध्ये ९०.८०% मार्क मिळवत प्रथम क्रमांक तसेच हिंदी अध्यापक मंडळामध्ये १०० पैकी ९५ मार्क मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक स्नेहल दशरथ कदम व तृतीय क्रमांक आयशा इन्नुस मुलाणी हिने पटकावला या यशाबद्दल या विद्यार्थांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात गौरी माने, साक्षी जाधव, तुकाराम घाडगे, सौरभ बनसोडे, शितल लुबाळ या विद्यार्थ्यांनी तसेच अंकुश इंगळे, मुख्याध्यापक जाधव सर व माजी प्राचार्य मधुकर कोथमिरे सर यांनी विविध विषयावरती विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी माजी सभापती श्रीराम पाटील यांनी परीक्षेसाठी सामोर्य जाताना काय करावे,तसेच पुढील शैक्षणिक आयुष्यात अवांतर वाचन करावे असे सांगीतले. तसेच शाळेतील विद्यार्थांनी वाटर कप स्पर्धेत भाग घेऊन आपले गाव पाणीदार बनवून आपल्या स्व:ताची वाटर बँक तयार करावी असे अहवान केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय खिलारे सर यांनी तर आभार आकाराम शिंदे सर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments