Hot Posts

6/recent/ticker-posts

बुलढाणा अर्बनची उल्लेखनिय कामगिरी: आ.जयकुमार गोरे.


म्हसवड @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
बुलढाणा अर्बन संस्थेच्या माध्यमाने संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी शेतक-यांचा शेतीमाल साठवणुकीसाठी ३२५ पेक्षा अधिक गोदामे सुरु केली.याबरोबरच म्हसवड व दहिवडी येथील या संस्थेतुन तीन हजार महिला बचत गटास विविध उद्योगासाठी अल्प व्याज दराने कर्ज पुरवठा करुन महिला आर्थिक सक्षमिकरणास मोठे योगदानही माण तालुक्यात दिले असे प्रतिपादन माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
 येथील बुलढाणा अर्बन बँक शाखेच्या ग्राहक मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.गोरे बोलत होते.
यावेळी म्हसवड पालिकेचे नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे,पालिका उपाध्यक्ष स्नेहल सूर्यवंशी,भाजपाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मासाळ, माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, डॉ.सुरेश मासाळ, डॉ.राजेंद्र मोडासे, डॉ.बाबर,बुलढाणा अर्बनचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे,विभागिय व्यवस्थापक मनोहर देशमुख इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
श्री.गोरे पुढे म्हणाले की,बुलढाणा संस्थेच्या माध्यमाने श्री. चांडक यांनी विशेष बाब म्हणुन माण तालुक्यामधील गरजु नवउद्योजक तरुणासह महिला उद्योजिकांना अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांचा व्यवसायाय उभारण्यास व त्यामध्ये वृध्दी होण्यासही खुपच मदत झाली.माणदेशात बुलढाणा संस्थेचे कार्यच मोलाचे आहे.माझ्या माणदेशातील लोक प्रामाणिक आहेत कर्ज घेतले तरी ते वेळेतही  त्याची परतफेड करतात हा या माणदेशी मातीतलाच गुण आहे.व त्याबाबत माणदेशी माणसं व महिलांबाबत मला अभिमान आहे.
बुलढाणा अर्बन संस्थेने येथील शेतकरी,बेरोजगार युवकासह महिलांनाही विविध उद्योग व्यवसायासाठी फायदेशीर व उपयुक्त अशा आणखी योजना राबवाव्यात असे आवाहनही श्री.गोरे यांनी केले.
 ग्राहकांच्या स्नेह मेळाव्याचे उद्घाटन आमदार गोरे यांचे हस्ते दीप प्रज्वलन भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले.
प्रास्ताविक भाषणात श्री.शिरीष देशपांडे यांनी बुलढाणा अर्बन संस्थेचे ग्राहकांसाठी विविध कर्ज पुरवठा योजनांची माहिती देऊन या संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा कथित केला.
या मेळाव्यास माण तालुक्यामधील विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी.आजी- माजी नगरसेवक, गावोगावचे सरपंच- उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शेतकरी बांधव,संस्थेचे सभासद,ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments