कातरखटाव @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या कातरखटाव-एनकूळ, कणसेवाडी या महत्वकांक्षी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ लवकरच ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंढे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती एनकूळचे सुपुत्र व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष सदाभाऊ खाडे यांनी दिली.
याबाबत पत्रकारांशी बोलताना श्री. खाडे म्हणाले, कातरखटाव - एनकूळ, कणसेवाडी हा पूर्व भागातील महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर दुध व शेतीमालाची वाहतुक होत असते. याशिवाय पवनचक्कीच्या अवजड वाहनांचाही मधून-अधून वावर असतो.वाढत्या वाहतुक तानामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. ही बाब आपण स्वत: तसेच परीसरातील भाजपा कार्यकर्ते यांनी ग्रामविकासमंत्री श्रीमती मुंढे यांच्या कानावर समक्ष घातली. त्यांनीही व्यक्तीगत लक्ष घालून या कामासंदर्भात शिफारस केली आहे. त्यांच्यामुळेच हे काम मार्गी लागले आहे. नजीकच्या काळात अंदाजपत्रक व इतर तांत्रिक बाबींची पुर्तता झाल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ होणार आहे. यावेळी श्रीमती मुंढे यांच्यासह भाजपाच्या मान्यवर पदाधिकार्यांना निमंत्रित केले जाणार आहे. परीसरातील स्थानिक कार्यकत्यांनी श्रेयवादाच्या भानगडीत न अडकता कामाचा प्रत्यक्ष दर्जा, गुणवत्ता व इतर बाबींबाबत जागृत रहावे असेही त्यांनी यावेळी नमुद केले. याशिवाय पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेवराव जानकर यांच्या माध्यमातूनही एनकूळ परीसरातील रखडलेली विकासकामे तसेच दुग्ध व्यवसायासंदर्भात महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यासंदर्भातह त्यांनी यावेळी सुतोवाच केले.

0 Comments