वाठार
वाठार स्टेशन,ता.कोरेगाव येथील प्रसिद्ध देवस्थान असलेले श्री समर्थ वाग्देव महाराज यांचे जीवनचित्र समोर येण्यासाठी वाठार येथील डॉ. शिवाजी माने यांनी चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला सातारा जिल्ह्यातील च युवा दिग्दर्शक प्रसाद माने यांच्याकडे ही दिग्दर्शनाची जबाबदरी दिली असून एप्रिल महिन्यात या चित्रपटाचे चित्रिकरण जवळपास एक महिना होणार असल्याचे लेखक - दिग्दर्शक प्रसाद माने यांनी सांगितले या चित्रपटातील संगीत आणि गाणी प्रभावशाली होणार असून महाराजांचे चरित्र यातून प्रकट होणार आहे दरवर्षी जानेवारी महिन्यात लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडते या चित्रपटामुळे महाराजांची कीर्ती महाराष्ट्रभर पोहचेल अशी अपेक्षा निर्माते डॉ.शिवाजी माने आणि दिग्दर्शक प्रसाद माने यांनी व्यक्त केली.

0 Comments