Ticker

6/recent/ticker-posts

पाटणकरांच्या पालखीचे शंभूराज भोई





पाटण, कै.भडकबाबा नगरी@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
कै.बाळासाहेब तथा भाई भडकबाबा पाटणकर स्मृतिदिनानिमित्त पाटण येथे आयोजित तिसऱ्या साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडी आज शुक्रवार दि.2 रोजी पाटण शहरातून उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली, या ग्रंथ दिंडीत शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वेशभूषा व चित्र रथांचे आकर्षणा बरोबर ढोल- ताशे लेझीम पथक आकर्षण ठरले, सकाळी पाटण नगरपंचायत पासुन या ग्रंथदिंडीस सुरवात झाली. या दिंडीचे ज्येष्ठ कवी लेखक प्रा.वैजनाथ महाजन,आमदार शंभुराज देसाई, स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर,ज्येष्ठ पत्रकार ए.व्ही.देशपांडे सर, साहित्यिक अरूण खांडके, सौ आयेशा सय्यद आदी मान्यवरांनी स्वागत केले.

Post a Comment

0 Comments