सातारा दि. 2 (जिमाका): घरमालकांनी भाडेकरुंचे नोंदणी संबंधीत पोलीस स्टेशनला करण्यास व घरमालकांनी घरभाडेकरुंचे रेकॉर्ड ठेवणे अनिवार्य आहे. तसेच पोलीस ठाणे हद्दीत भाड्याने राहणा- या भाडेकरुंची माहिती घरमालकांनी पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक आहे. ज्या घरमालकांनी आपले घर भाड्याने दिले असल्यास त्यात राहणा-या भाडेकरुची माहिती पोलीस ठाण्यास दिली नाही अशा घरमालकांवर या कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे
ज्या घरमालकांनीअद्यापपर्यंत आपलेकडील भडेकरुंची माहिती नजिकच्या पोलीस ठाण्यास दिली नसेल त्यांनी तात्काळ भाडेकरुची माहिती पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात दिलेल्या प्रपत्रात भरुन सादर करावी. घरमालकांना आपले घर भाड्याने देत असताना भाडेकरुंकडून फोटेा ओळखपत्र व मुळ पत्ताचा रहिवासी पुरावा घेतल्याशिवाय घर भाड्याने देवू नये. घरमालकांनी भाडेकरुंची स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. भाड्याने रहात असलेल्या भाडेकरुंची माहिती संबंधीत पोलीस स्टेशनला बिनचुक द्यावी, असेही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कळविले आहे.
0 Comments