पाटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण तालुका भारतीय जनता पक्षाची बैठक पक्षप्रवक्ते मा.भरतजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पार पडली, पक्षाचे वतीने शिवजयंती निमित्त छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, या बैठकीस महिला जिल्हाध्यक्षा मा. सौ.कविताताई कचरे, सौ.आयेशा सय्यद, महिला जिल्हाउपाध्यक्ष, विस्तारक रावसाहेब क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती ,यावेळी शिवप्रतिमेस हार घालुन छ.शिवाजी महाराजांचे जिवन कार्याची महती सांगण्यात आली. या बैठकीमध्ये फत्तेसिंह पाटणकर यांची भाजपाचे पाटण तालुकाध्यक्ष पदी निवड करणेत आली याचवेळी मा.तालूकाध्यक्ष कमलाकर पाटील यांची भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस पदी निवड झालेची पक्ष प्रवक्ते मा.भरतजी पाटील प्रदेश कार्यकारीणी सदस्य यांनी जाहिर केले .
यावेळी नुतन तालूकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर यांनी पाटण तालुक्यामधील गटा तटाचे असणारे राजकारण संपुष्टात आणून भाजपाचे माध्यमातुन पाटण तालुक्याला केंंद्र, राज्य सरकार, पक्षाचे वरीष्ठ पदाधिकारी यांचे सहकार्याने नविन विकासाची दिशा दाखवु असा आत्मविश्वास व्यक्त केला.वरिष्ठ पदाधिकारी , सहकारी यांचे सहकार्याने पाटण तालुक्यामध्ये पक्ष बांधणी व मजबुतीकरण केले जाईल , तसेच पक्षाचे माध्यमातून केंद्र , राज्य शासनाचे योजनेचा लाभ शेवटच्या तळागाळातील लाभार्थ्याला कसा दिला जाईल यावर आगामी काळात भर देणार असल्याचे सांगितले.
यावेळी बैठकीस उपस्थित चंद्रकांत भिसे तालूकाध्यक्ष भाजपा अनूसूचित जाती आघाडी, अनिल बोधे सोशल मिडिया तालुकाप्रमुख , रविंद्र मिसाळ किसान मोर्चा तालूकाध्यक्ष, योगेश महाडीक भाजपा पाटण शहराध्यक्ष , काशिनाथ विभुते, गणेश खांडके , सागर जाधव युवा सघटक, चंद्रकांत गव्हाणे चिटणीस, यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
फत्तेसिह पाटणकर(भैय्या) यांची पाटण तालुकाध्यक्षपदी तसेच कमलाकर पाटील यांची सातारा जिल्हा चिटणीस पदी निवड झालेबददल भाजपा राज्य अध्यक्ष रावसाहेबजी दानवे चंंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्री, गिरीषजी बापट, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, रवीअनिसपूरे प.महाराष्ट्र संघटनमंत्री, अतुल भोसले ,अध्यक्ष विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपुर, शेखरजी चरेगावकर .अध्यक्ष सहकार परिषद, सागर माने जिल्हापाध्यक्ष, अनूप सुर्यवंशी जिल्हा संघटन सरचिटणीस, दिपक महाडीक संयोजक , माजी सैनिक आघाडी, रामभाऊ लाहोटी , मा.पं स सदस्य नानासो सावंत मा. प.स सदस्य नंदकूमार सुर्वे तालूका उपाध्यक्ष लहुराज पवार, सचिन जाधव , धिरज कदम, प्रविण ऊदूगडे, समीर भोसले यांच्या सह इतर पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

0 Comments