कलेढोण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मुळीकवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य व पुणे येथील वैष्णवी उद्योग समुहाचे संचालक बाळासाहेब मधुकर पुकळे यांचा कलेढोण येथील श्री. हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आदर्श माजी विद्यार्थी पुरस्कार देवून आ. जयकुमार गोरे यांच्याहस्ते विशेष गौरव करण्यात आला.
मुळीक हे हनुमान शिक्षण मंडळाच्या विद्याविकास मंदीर शाळेचे माजी विद्यार्थी असून मुळीकवाडीसारख्या खेडेगावात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेवून त्यांनी पुणेसारख्या मोठ्या शहरात ज्वेलरी व बांधकाम व्यवसायामध्ये मोठा नावलौकीक मिळविला आहे. वैष्णवी ज्वेलर्स व वैष्णवी बिल्डर्स या दोन फर्मचे ते संचालक आहेत. उद्योग, व्यवसाय क्षेत्रात मोठी भरारी घेतली तरी त्यांचे आपण ज्या मातीत व शाळेत घडलो त्या मातीशी त्यांनी कायम नाळ जोपासली आहे. ते दरवर्षी 10 वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावणार्या विद्यार्थ्यास चांगले बक्षीस देतात. याशिवाय इतर शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात त्यांचे चांगले योगदान असते. कार्यक्रमास श्री हनुमान पतसंस्थेचे अध्यक्ष संजीव साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, डॉ. एस. एन. पवार, युवा नेते शंकरराव माळी, सरपंच भास्कर खरात, मधुकर पुकळे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. श्री. पुकळे हे उद्योगपती जीवनशेठ पुकळे यांचे बंधू तर पंचायत समिती सदस्य मेघाताई पुकळे यांचे दीर आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 Comments