वडूज@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
अंबवडे ता खटाव येथील अवैध वाळू उपसा केल्या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आपला वाळू व्यवसायाशी कोणताही संबंध नसताना गुन्हा दाखल करून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम प्रशासनाने केले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दाऊदखान मुल्ला यांनी तहसीलदाराना दिलेल्या निवेदनात केला आहे.
याबाबत निवेदनातील माहिती अशी आपण स्वतः वाळू चोरी करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल व्हावे म्हणून वेळोवेळी आंदोलने केली आहेत. तसेच अंबवडे येथील नदीच्या पात्रात वाळू तस्करानी काढलेल्या खड्यात २०१५ साली तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या संदर्भात वाळू तस्करांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले होते. तसेच अन्याया विरुद्ध नेहमी आवाज उठवला आहे.
तर माझा वाळू व्यवसायाशी कोणताही संबंध नसून व माझ्याकडे कोणतेही वाहन नसून जाणून बुजून आरोप करणारे सोमनाथ काकडे व रामभाऊ यांच्या वाळू उपसा व्यवसायाविरुद्ध मी तोंडी तक्रारी अधिकाऱ्यांकडे केल्याने तसेच काकडे यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांना कानकुन लागल्यानंतर त्यानी द्वेषापोटी खोटा तक्रारी अर्ज केला असून त्याबाबत कोणतेही सबळ पुरावे न देता व कोणतीही चौकशी न करता तहसीलदारांची दिशाभुल करून खोटा गुन्हा दाखल केला आहे.

यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम हे प्रशासन करीत आहे. व श्री काकडे हेच शेतातील वाळू विक्रीचा व्यवसाय करीत आहेत त्यामुळे त्यांच्या वर गुन्हे दाखल होण्या ऐवजी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. तसेच चौकशी व शहानिशा करून मला न्याय देऊन माझ्यावरील दाखल झालेला गुन्हा माघारी घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

0 Comments