सातारा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असलेल्या मायणी ता. खटाव येथील फ्रेंड्स ग्रुप बहुउद्देशीय विकास संस्थेस युवा संकल्प सोशल फाउंडेशन माण- खटाव यांच्यावतीने आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
युवा संकल्प सोशल फाउंडेशन यांच्यावतीने व शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने शिवजयंतीचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात खटाव- माण तालुक्यात उल्लेखनीय काम करणार्या संस्थांना आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार देण्यात येतो.त्यानुसार मायणीच्या फ्रेंड्स ग्रुप बहुउद्देशीय विकास संस्थेस आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
युवा संकल्प सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश जाधव व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते व पोलिस उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर, शिवचरित्र व्याख्याते संभाजी देसाई ,मानवाधिकार संघटनेचे अतुल पवार ,बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी.पाटील,एमएम ग्रुपचे अध्यक्ष अक्षय राजमाने,रवी बोडके, युवा संकल्प सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रविण बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सयाजी उर्फ महेश जाधव व सचिव संदीप कुंभार यांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सयाजी उर्फ महेश जाधव व सचिव संदीप कुंभार यांनी आपल्या सहकाऱयांच्या सहकार्याने संस्थेमार्फत गेली तेरा वर्षे विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतुने मायणी व परिसरामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करणे,गरिब मुला - मुलिंना शिष्यवृत्ती व शैक्षणिक खर्च उचलने,पशु-पक्षांना चारा पाण्याची सोय करणे,पाणी बचत करणे,वृक्षारोपण करणे,रक्तदान व आरोग्य शिबिर,स्वच्छता अभियान,पर्यावरण जन जागृती,सांस्कृतिक कार्यक्रम,स्पोर्टस शिबिर,युवकांसाठी चर्चासत्र आदि विविध उपक्रम संस्थेमार्फत राबवत आहेत.
फ्रेंड्स ग्रुपला आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल या संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व हितचिंतकांनी अभिनंदन केले


0 Comments