Ticker

6/recent/ticker-posts

फलटण येथे शॉर्ट सर्किटमुळे पाच घरांना आग (व्हिडिओ सह बातमी)


फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
टाकळवाडा तालुका फलटण येथे आज दुपार 1:30 चे सुमारास महावितरणची वायरच्या शॉर्ट सर्किटमुळे पाच घरास आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  टाकळवाडा येथे दुपारी 1:30 चे सुमारास अचानक घराच्यावरून गेलेली महावितरणच्या वीज वायर शॉर्ट होऊन मल्हारी महादेव आवटे,पोपट मल्हारी आवटे, ज्ञानदेव रामा मदने, अकबर महंमद शेख, बाजीराव बाबा मदने यांच्या राहत्या घरांना आग लागून पाच घरे पूर्णतः जळून खाक झाली असून पाचही कुटूंब बेघर झाली असून महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात या वीज शॉर्ट सर्किटमध्ये पाच घराचे व घरातील वस्तूचे एकूण 7,52,644/- रुपयाचे नुकसान झाले आहे.

मागील पाच महिन्यांपूर्वी टाकळवाडा ग्रामपंचायत यांनी गावात पूर्णवेळ वायरमन द्यायची व गावातील धोकेदायक वीज पोल व वीज लाईन यांची कामे तत्काळ करण्याबाबत ठराव महावितरणला दिला होता परंतु गेली पाच महिन्यात महावितरणच्या कार्यालयाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. महावितरणच्या बेजबाबदार पणामुळे हा अपघात घडला असल्याचा माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments