Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटणला युवकाची आत्महत्या


फलटण@ सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
शुक्रवार पेठ , फलटण येथील पवन चंद्रकांत चिंचकर वय २० याने राहते घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक २३ रोजी दुपारी साडेबारा ते रात्री आठ वाजणेच्या दरम्यान मयत पवन चिचकर याने राहते घरातील लोखंडी वाशाला गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत मयुर नंदकुमार क्षीरसागर याने पोलिस ठाण्यात नोंद दिली. अधिक तपास हवालदार सोनवलकर करत आहेत.

भाजी विक्रीसाठी गेलेला  बेपत्ता 

शंकर मार्केट, फलटण येथे भाजी विक्रीसाठी गेलेला मुलगा अद्याप घरी न आल्याने तुकाराम साहेबराव तरटे यांनी पोलिस ठाण्यात नोंद दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाठार निंबाळकर ता.फलटण येथील तरटेवस्तीवरील हैबत तुकाराम तरटे वय ३० हे दिनांक २२ रोजी फलटण येथील शंकर मार्केट येथे भाजी विक्रीसाठी गेले होते. यावेळी दुपारी १ वाजता भाजी विकुन घरी जात असल्याचे नातेवाईक अमोल ननावरे यास सागुंन घरी न येता कोठे तरी निघुन गेला. तो अद्याप परत न आल्याने पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. हवालदार भोईर अधिक तपास करत आहेत.

ऊसतोड महिलेचा बुडून मृत्यू 

पिराचीवाडी तालुका फलटण येथे ऊसतोड कामगार महिलेचा विहिरीतुन पाणी काढताना पाय घसरल्याने पाण्यात बुडुन दुर्दैवी अंत झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,येथील शिवारा ऊस तोडीसाठी आलेल्या सविता सोमेश्वर लोंढे, वय - २३, राहणार - तांदुळवाडी हवेली, जिल्हा- बीड ह्या सकाळी आठ वाजणेचे सुमारास पाणी आणण्यासाठी विहरीवर गेल्या होत्या. यावेळी विहिरीत पाय घसरुन पडल्याने बुडून दुर्दैवी अंत झाला. याबाबत पती सोमेश्वर लोंढे यांनी फलटण पोलिस ठाण्यात खबर दिली. सहाय्यक फौजदार खुडे अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments