Hot Posts

6/recent/ticker-posts

वाई तालुक्यात ५ सरपंच राष्ट्रवादीचे, कुसगावला काँग्रेस


वाई @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
वाई तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चिंधवली, विठ्ठलवाडी, ओहळी, खडकी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच निवडुण आल्याने वर्चस्व राहिले. तर अंतर्गत गटबाजीमुळे कुसगाव ग्रामपंचायतीत परिवर्तन होवून काँग्रेसचा सरपंच निवडुण आला. ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार पुढील प्रमाणे कंसात त्यांना मिळालेली मते. कुसगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदी शामराव घाडगे (501) यांनी 225 मताधिक्याने विजय मिळविला. सदस्यपदी दिपाली कळंबे (161), जितेंद्र गोळे (168), विजया बोडरे (238), प्रकाश वरे (244), सुजाता किरवे (161), शारदा वरखडे (165). खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सरोज शिंगटे (574) यांनी 177 मताधिक्याने विजय मिळविला. सदस्यपदी रुपाली शेंडे (134), प्रिया शिंगटे (138), प्रभाकर कांबळे (276), धनाजी लांडगे (306), सारिका शिंगटे (256). विद्या शिंगटे व रमेश शिंगटे हे दोन सदस्य बिनविरोध निवडुण आले आहेत.चिंधवलीच्या सरपंचपदी रुपाली कांबळे (793) यांनी 53 मताधिक्याने विजय मिळविला. सदस्यपदी रुपाली निकम (272), जयश्री पवार (266), सज्यविजय पवार (261), मनोज गवळी (289), सुषमा इथापे (305), अविनाश निकम (240), सविता काकडे (264), वैशाली जाधव (268), अनिता इथापे (285).

ओहळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत संजय वाडकर (108) विजयी झाले. यापूर्वी सदस्यपदी सहदेव वाडकर, सिंधू घोलप, अनुसया घोलप, जयश्री घोलप हे बिनविरोध निवडुण आले आहेत.

विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठीच्या निवडणुकीत रंजना पाटणे (102) या विजयी झाल्या. यापूर्वी सदस्यपदी नंदा निकम, चंद्रकांत पाटणे, बाळू गोळे, ताराबाई निकम, कमल पाटणे या बिनविरोध निवडुण आल्या आहेत.चांदक ग्रामपंचायतीत एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राजेंद्र खामकर (165) विजयी झाले.

तहसिलदार अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात मतमोजणी झाली. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. गुलालाची उधळण करीत विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments