Hot Posts

6/recent/ticker-posts

बोंद्रीच्या जानाईदेवीची आज, उद्या यात्रा


पाटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क  
पाटण तालुक्यातील बोंद्री गावचे ग्रामदैवत श्री जानाईदेवीची यात्रा गुरुवार दिनांक २२ व शुक्रवार दिनांक  २३ रोजी भरणार आहे.
यात्रेनिमित्त गुरुवार  २२ रोजी रात्री ९ वाजता देवीचा गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे, मनोरंजन रात्री ठिक ९•३०वाजता गणेश सेवा  नाट्य  मंडळाच्या वतीने तीन अंकी तुफान विनोदी, थरारक नाटक  "बेरडाची औलाद" सादर करण्यात येत आहे.
गुरुवार दिनांक २३ रोजी  सकाळी ११ वाजता अभिनय सम्राट महादेवराव मनवकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे तसेच  दुपारी ४ वाजता जंगी कुस्त्यांचा फडाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा  लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत बोंद्री व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments