Hot Posts

6/recent/ticker-posts

साताऱ्यात १४ मार्चला महासत्संग


सातारा @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क  
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सातारा माहिती केंद्रातर्फ येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर १४ मार्च रोजी सायं ६ वा  परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत महासत्संगाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्राचे समन्वयक सुधीर घार्गे संजय खटावकर अभय चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी दुपारी ३ते५ या वेळेत युवाचार्य संमेलन होणार असून या संमेलनाला सातारा जिल्ह्यातील पाच हजार साधक या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत . घार्गे पुढे म्हणाले आर्ट ऑफ लिव्हिंगचे सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक विकास साधण्याचे कार्य १५५ देशांमध्ये सुरू आहे . महासत्संगामध्ये रविशंकर यांच्या समवेत भजन ज्ञानामृत ध्यान असा अनोखा अनुभव मिळण्याची संधी मिळणार आहे . युवाचार्य संमेलनाला ५००० प्रशिक्षकाना स्वतः रविशंकर मार्गदर्शन करणार आहेत . यावेळी शिवदास कदम श्रध्दा लांडे संदीप सुतार प्रिया जगदाळे सुनीता पवार वर्षा खटावकर भारती जगताप  यतीन जोशी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments