येरवळे @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कराड तालुक्यातील येरवळे येथील जूने गावठाण श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भारतीय जनता युवा मोर्चा शाखा उद्बाटन समारंभ विविध मांन्यवराच्या उपस्थितीत पार पडला .
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष युवा नेते डाॅ.अतुल भोसले (बाबा) , भाजपा तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते ,मलकापूरचे जेष्ठ नगरसेवक हणमंतरावजी जाधव , भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पंकज पाटील ,यांची प्रमुख उपस्थिती होते. मान्यवरांचा सत्कार शाखाध्यक्ष विशाल खंडागळे.उपाध्यक्ष गौरव यादव ,चिटणीस निलेश यादव ,सरचिटणीस रोहित यादव यांनी केले.
यावेळी बोलताना डाॅ. अतुल भोसले (बाबा) म्हणाले की युवकांनी भारतीय जनता पार्टीची विचारधार तळागाळात पोहचवण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्टाचे मुख्यमंञी मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्यात लोककल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या जात आहेत. या योजना सर्व सामांन्य जनते पर्यंत पोहचवण्याचे काम युवकांनी केले पाहिजे. तसेच गावाच्या विकासासाठी गटतट न पाहता सर्वांनी एकजूटीचे कामाला लागले पाहिजे. व आगामी काळात कराड दक्षिण मतदार संघात परिवर्तन घडवून भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. येरवळे गावाच्या विकासासंबधी मी सदैव तत्पर असुन या विकास कामांसाठी लागणारी सर्व मदत आगामी काळात केली जाईल. त्याच बरोबर गावकर्यांनी भूलथामा मारणार्या प्रवृत्तीपासुन लांब राहून आदर्श गाव बनवण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे असे आवाहन डाॅ. अतुल भोसले (बाबा) यांनी यावेळी केले,
यावेळी येरवळे गावातील युवक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.स्वागत विशाल खंडागळे यांनी केले. व आभार गौरव यादव यांनी मानले .

0 Comments