Hot Posts

6/recent/ticker-posts

जमिनीच्या वादातून वृद्धाची हत्या.


वाकेश्वर येथील घटना. वडूज पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल.


वडूज @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वाकेश्वर ता खटाव येथे जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात महादेव मुगुटराव फडतरे वय ६३ रा वाकेश्वर यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी संशयित आरोपी गुलाब रामा फडतरे, संतोष गुलाब फडतरे, गणेश वाघ ( सर्व रा वाकेश्वर) यांनी वाकेश्वर येथे आज सकाळी ११:३० वाजता आपआपसांत संगनमत करून मयताच्या जमिनीत अतिक्रमण करून ताल जेसीबी व ट्रॅकटर च्या साह्याने तोडत असताना फिर्यादी व मयत व्यक्ती यांनी समजावून सांगितले असता त्यांनी न एकता मयत व्यक्ती व फिर्यादीचा भाऊ महेश यांना मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली . व भाऊ महेश याच्या मांडीला संतोष फडतरे याने चावा घेऊन जखमी केले. व मयत महादेव फडतरे यांच्या छातीवर मारहाण करण्यात आली या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद महेंद्र महादेव फडतरे (रा वाकेश्वर) यांनी वडूज पोलिसात दाखल केली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान तीन ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments